उद्याचे मार्केट – 21-07-2023 Nifty / Bank Nifty

उद्याचे मार्केट – 21-07-2023 Nifty / Bank Nifty

उद्याचे मार्केट – 21-07-2023 Nifty / Bank Nifty

नमस्कार ट्रेडर्स, आजच्या पोस्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
चला तर बघूया आज झालेल्या निफ्टी आणि बँक मध्ये घडामोडी आणि उद्या होणाऱ्या निफ्टी आणि बँक निफ्टी मधील घडामोडी .

Nifty Analysis

बुधवारी निफ्टी 19847 ला क्लोज झाल्यानंतर आज गुरुवारी निफ्टी flat ओपन झाले. आजचा निफ्टीचा ओपनिंग 19841 होते. काल सांगितल्याप्रमाणे मार्केट 19759 या support ला येऊन upward move झाले. काल diagram  मध्ये दाखवल्या प्रमाणे मार्केटने Scenario 3 नुसार MOVE केले. आज दिवसभर मार्केट upward ट्रेंड मध्ये होते. सलग २ दिवस मार्केट sideways होते त्यामुळे आज मार्केट trending राहिले. आज nifty ने highest गाठला 19991 ला.

market prediction 21-07-23

जर उद्या मार्केट flat ओपेन होऊन 19986 च्या resistance वर होल्ड केले आणि नंतर Bullish सिग्नल दिला तर आपण CALL buy करणार. आणि जर खाली 19904 या support वर येऊन होल्ड केले आणि Bearish सिग्नल दाखवला तर आपण PUT buy करणार. जर 19900 ला येऊन खाली यायला लागले तर आपण लगेच PUT buy करणार.  Image मध्ये दाखवल्याप्रमाणे 3 scenario होऊ शकतात. 15 मिनिटाच्या time frame चा वापर करून diagram मध्ये 3 scenario दिले आहेत.
तर बघूया उद्या मार्केट कसे react करते.

Nifty च्या लेवल्स खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.

Resistance लेवल्स 19950-20004-20055
Support लेवल्स 19900-19852-19814

 

 

Bank Nifty Analysis

बँक निफ्टी बुधवारी 45668 ला क्लोज झाले आणि गुरुवारी 45759 ला ओपन झाले. गुरुवारी  जवळ जवळ 90 पॉईंट  ने गॅप अप झाले. सुरुवातीला मार्केट sideways चालले आणि  काल सांगितल्या प्रमाणे म्हणजे आपण जसे Predict केले होते कि मार्केट upward rally देवू शकते त्याप्रमाणेच झाले आणि diagram मध्ये दाखवल्या प्रमाणे Scenario 1 सारखे मार्केट गेले आणि Bank Nifty 46256 पर्यंत येऊन पोहोचली.

market prediction 21-07-23

जर मार्केट flat ओपन झाले तर, थोडं Side ways होऊन एक तर ते वरच्या डायरेक्शनने जाईल म्हणजेच 46400 पर्यंत. किंवा डाऊन साईडला 45601 ला येवू शकते. जर मार्केट गॅप अप झाले तर थोडे side ways जाऊन Correction होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 45601 पर्यंत येवू शकते. आणि जर मार्केट गॅप डाउन ओपेन झाले तर ते 45601 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. उद्या upward जाण्याची शक्यता कमीच आहे. Diagram मध्ये 15 मिनिटाच्या time frame वर  हे तिन्ही scenario दिले आहेत.

Bank Nifty च्या लेवल्स खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.

Resistance लेवल्स 46245-46400-46600
Support लेवल्स 46165-45982-45601

 

नोट : मार्केट ओपन झाल्या झाल्या CALL Buy करण्याची घाई करू नका आणि गॅप डाऊन झाल्या वर लगेच PUT Buy करण्याची घाई सुद्धा करू नये. इमेज मध्ये लेव्हल्स काढल्या आहेत जर आपल्या लेव्हल्स आल्या तरच ट्रेड घ्या, अन्यथा ट्रेड घेण्यास टाळा.

मोफत डि-मॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://sharemarketchiduniya.in

 https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570

 

Disclaimer

Share market chi duniya या वेबसाईट वरचा डेटा एनलाईज करण्यासाठी योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगलेली आहे. या वेबसाईटवरील सर्व डेटा हा फक्त आणि फक्त शैक्षणिक हेतूसाठी दिलेला असून शैक्षणिक हेतूसाठीच वापरावा. Share market chi duniya हे SEBI नोंदणीकृत सल्लागार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक करण्या अगोदर आपण SEBI नोंदणीकृत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Share market chi duniya कोणत्याही डेटाची अचूकतेची हमी देत नाही. आणि त्यातून निघालेल्या परिणामाला जबाबदार नाही.

Leave a Comment