शेअर मार्केट काम कसे करते ? how share market works?

शेअर मार्केट काम कसे करते ? how share market works?

शेअर मार्केट काम कसे करते ? how share market works?

आजच्या जगात शेअर मार्केटमध्ये लोकांची आवड सतत वाढत चालली आहे म्हणूनच जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करायचे असेल तर तुम्हाला शेअर मार्केट काम कसे करते हे जाणून घेतले पाहिजे.

शेअर मार्केट काम कसे करते ?  how share market works ? हे जाणून घेण्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की शेअर मार्केट म्हणजे काय? तर शेअर मार्केट हे एक इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे जिथे गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतात. शेअर मार्केट हे सूचीबद्ध कंपनीतील भाग भांडवल खरेदी आणि विक्रीचे एक ठिकाण आहे. आणि ही खरेदी-विक्री स्टॉक एक्सचेंज द्वारे होते म्हणजेच स्टॉक एक्सचेंज हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे शेअर्स खरेदी आणि विक्री केली जाते.

भारतात दोन प्राथमिक स्टॉक एक्सचेंज आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE). तसेच एक प्रायमरी मार्केट आहे, जिथे कंपन्या पहिल्यांदा सूचीबद्ध केली जातात म्हणजेच लिस्टिंग केली जाते आणि सेकंडरी मार्केट आहे जिथे शेअर्सची खरेदी विक्री होते.

शेअर मार्केट काम कसे करते

१. पूर्वीच्या काळी शेअर मार्केट कसे चालायचे?

आजच्या युगात शेअर मार्केट मधील खरेदी आणि विक्री मोबाईलवर एका क्लिकवर आपण  करू शकतो पण जुन्या काळात असे नव्हते त्यावेळेस शेअर्सचे खरेदी विक्रीसाठी मुंबईत असलेल्या स्टॉक एक्सचेंज मध्ये जावे लागत होते. तेव्हा ब्रोकर सुद्धा नव्हते आणि कंपन्यांची माहिती अशी ऑनलाइन उपलब्ध नव्हती.

याच्याही अगोदर भारतात शेअर मार्केट 18 व्या शतकात सुरू झाला.. मुंबईच्या टाऊन हॉल समोर वटवृक्षाखाली काही व्यापाऱ्यांनी व्यापार करण्यास सुरू केले होते, मग या मोजक्या व्यापाऱ्यांनी कापसाचा व्यापार सुरू केला. मुंबई हे सर्वात वरदळीचे व्यापारी बंदर असल्याने जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार तिथे होत असे. नंतर सुमारे दोन दशकानंतर दलालांची संख्या वाढू लागली आणि एक व्यापारांचा गट तयार झाला या गटाचे नाव होते”नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन”. यानंतर सतत बदल होत गेले आणि 1956 मध्ये पहिले मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज अस्तित्वात आले. 1986 मध्ये BSE स्टॉक एक्सचेंज ची स्थापना झाली. 30 स्टॉकचे एकच एक्सचेंज होते.  BSE हे जगातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे.

तसे बघितले तर आजच्या युगात शेअर मार्केट खूपच सोपे झालेले आहे जसे की आपण विविध कंपन्यांचा अभ्यास ऑनलाइन बघू शकतो आणि ब्रोकर सुद्धा अवेलेबल आहेत .

आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया शेअर मार्केट कसे काम करते?

२. शेअर मार्केट कसे काम करते ?

शेअर मार्केट हे एक इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे जिथे ट्रेडर्स एकमेकांना शेअर खरेदी आणि विक्री करतात. BSE आणि NSE स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स द्वारे ट्रेड केले जातात.

शेअर मार्केटला 11 सेक्टर मध्ये वाटलं गेलेले आहे ,त्यांच्या आवश्यकतेनुसार या सेक्टरमध्ये ट्रेड करतात. हे अकरा सेक्टर पुढीलप्रमाणे:

  • फाइनेंशियल (Financial)
  • कस्टमर डिस्क्रिशनरी (Customer discretionary)
  • उपयोगिताओं (Utilities)
  • सूचना प्रौद्योगिकी (Information technology)
  • हेल्थकेयर (Healthcare)
  • इंडस्ट्री (Industry)
  • संचार (Communication)
  • एनर्जी (Energy)
  • रियल एस्टेट (Real Estate)
  • मैटेरियल्स (Materials)
  • कंज्यूमर स्टेपल्स (Consumer Staples)

शेअर मार्केट सोबत हे सेक्टर सुद्धा ग्रो करत असतात आणि वेगवेगळ्या इंडस्ट्री कव्हर करतात. या सेक्टरमध्ये काही असे सेक्टर आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात.

भारतामध्ये शेअर मार्केट चांगल्या प्रकारे परिभाषित रचना आणि प्रक्रियेद्वारे चालतो तर ही प्रक्रिया किंवा यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे घटक असतात आणि ते कसे काम करतात ते जाणून घेऊ.

  1. स्टॉक एक्सचेंज:-वर सांगितल्याप्रमाणे भारतीय शेअर मार्केटमध्ये दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज(NSE). हे एक्सचेंज शेअर्स, बाँड्स, डेरिव्हेटिव्ह आणि म्युचल फंडासह वेगवेगळ्या सिक्युरिटीच्या व्यापारासाठी ( खरेदी विक्रीसाठी) एक प्लॅटफॉर्म प्रदान करतात.भारतीय स्टॉक एक्सचेंज हे एक व्यासपीठ आहे जिथे स्टॉक आणि इतर आर्थिक साधनांची खरेदी विक्री केली जाते. आता त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण जाणून घेऊ.बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE):-  बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातील सर्वात जुनी स्टॉक एक्सचेंज आहे जे 1875 मध्ये स्थापन झाले मुंबई येथे.BSE मध्ये खरेदीदार आणि विक्रेते स्टॉक, बाँड्स, डेरिव्हेटिव्ह आणि विविध आर्थिक साधनांचा व्यापार करण्यासाठी एकत्र येतात. BSE मध्ये मोठ मोठ्या संख्येने लिस्टिंग झालेल्या कंपन्या आहेत आणि त्यांचा निर्देशांक सेन्सेक्स हा मार्केटचा एकूण बॅरोमीटर म्हणून काम करतो.नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE):- नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे 1992 मध्ये मुंबईत येथे स्थापन झाले. यालाNSE म्हणून संबोधले जाते.BSE प्रमाणेचNSE  विविध आर्थिक साधनांचा व्यापाराची सोय करते. भारतात इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सुरू करण्यासाठी NSE ओळखले जाते, याचा निर्देशांक निफ्टी-50 आहे. ज्यामध्ये 50 लार्ज कॅप शेअर्सच्या कामगिरीचा मागोवा घेण्यात येतो. BSE आणि NSE हे दोन्ही गुंतवणूकदारांना सिक्युरिटी खरेदी आणि विक्रीसाठी पारदर्शक आणि नियमन केलेले मार्केट प्लेस प्रदान करतात. हे नियमन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे केले जातात. भारतीय शेअर मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंज हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
  2. लिस्टेड कंपन्या:- ज्या कंपन्यांना त्यांचा व्यवसाय अजून  वाढवण्यासाठी भांडवल उभा करायचा आहे त्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO  द्वारे करू शकतात. एकदा सूचीबद्ध झाल्यानंतर त्यांचे शेअर्स सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी आणि विक्रीसाठी उपलब्ध होतात. आणि हेच खरेदी -विक्री स्टॉक एक्सचेंज वर केली जाते. सूचीबद्ध कंपन्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देतात,  रोजगारात योगदान देतात आणि आर्थिक विकासात चालना देतात, अशा प्रकारे सूचीबद्ध कंपन्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सूचीबद्ध कंपनी असल्याने अनेक फायदे मिळतात जसे की वाढलेली पारदर्शकता, भागधारकांसाठी लिक्विडिटी आणि मार्केटमधील क्रेडिबिलिटी.
  3. ट्रेडिंग मेकॅनिझम:- शेअर मार्केट हे ओपन क्राय आणि इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्रणाली वर चालते. ओपन क्राय पद्धतीमध्ये व्यापारी ट्रेडिंग फ्लोअरवर खरेदी-विक्रीच्या ऑर्डर देतात. तसेच बहुतांश व्यापार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतो, जसे ऑर्डर computerized व्यापार प्रणाली मध्ये प्रविष्ट केल्या जातात.भारतीय शेअर मार्केट मधील ट्रेडिंग मेकॅनिझम म्हणजे ज्यामध्ये  शेअर, बॉण्ड्स आणि डेरिगेटिव्ह सारख्या सिक्युरिटीची खरेदी आणि विक्री होते.
  4. व्यापाराचे तास:- भारतीय शेअर मार्केट आठवड्यातून पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.15 a.m ते दुपारी 3.30 p.m दरम्यान असतात. भारतीय ट्रेडिंग सत्र तीन भागांमध्ये विभागलेले आहेत. प्रि-ओपनिंग सत्र, नियमित ट्रेडिंग सत्र, आणि बंद सत्र. शेअर मार्केट आठवड्यातील पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये नियमितपणे सकाळी 9.15 वाजता उघडते.
    पण काही काल मर्यादा आहेत ज्यांची आपल्याला ओळख असणे गरजेचे आहे. ऑर्डर एन्ट्री साठी प्री ओपनिंग सत्र असते, सकाळी 9.00 ते सकाळी 9.08 पर्यंत.आणि त्यापूर्वी 8.45 AM ते 9.00AM दरम्यान ब्लॉक डील सत्र असते. या पंधरा मिनिटात दरम्यान दोन पक्षांमध्ये सौदे अवरोधित केले जातात. जेथे व्यवहारांचा आकार किमान  पाच लाख शेअर किंवा किमान मूल्य पाच कोटी आहे . या सौद्यांची तपशील स्टॉक ब्रोकर त्यांच्या ट्रेडिंग क्लाइंटला ट्रेडिंग सत्राच्या शेवटी देतात.शेअर मार्केट नियमितपणे दुपारी 3.30  वाजता बंद  होते. सकाळच्या  सत्राप्रमाणे दुपारचे ब्लॉगडील सत्र असते, जे दुपारी 2.05 ते 2.20 दरम्यान असते. याशिवाय दुपारी 3.30 ते दुपारी 3.40 दरम्यान बंद सत्र असते.
  5. स्टॉक ब्रोकर्स:-आपल्यासारखे वैयक्तिक गुंतवणूकदार किंवा व्यापारी संस्था शेअर मार्केट च्या व्यवहारात थेट भाग घेऊ शकत नाही. त्यासाठी स्टॉक ब्रोकर्स ची गरज असते, stock ब्रोकर्स गुंतवणूकदारांनी दिलेल्या ऑर्डरची अंमलबजावणी करतात आणि ट्रेडिंग सेवा प्रदान करतात. आता आपण बघूया स्टॉक ब्रोकरची भूमिका काय आहे.
    • स्टॉक ब्रोकर हे शेअर बाजार मधील मध्यस्थ आहेत जे गुंतवणूकदारांच्या वतीने सिक्युरिटीची खरेदी आणि विक्री सुलभ करतात.
    • स्टॉक ब्रोकर गुंतवणूकदारांसाठी एजंट म्हणून काम करतात.
    • स्टॉक ब्रोकर स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश प्रदान करतात.
    • ते व्यवहार चालवतात.
    • स्टॉक ब्रोकर गुंतवणूकदारांना गुंतवणूक सल्ला आणि सेवा देतात.स्टॉक मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायची असेल तर प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह स्टॉक ब्रोकर निवडणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी ब्रोकर्सची प्रतिष्ठा, ट्रॅक  रेकॉर्ड, ऑफर केलेल्या सेवांची श्रेणी, ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, ट्रेडिंग फी आणि ग्राहक समर्थन या सर्व गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
  6. ऑर्डर चे प्रकार:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार वेगवेगळ्या ऑर्डर देऊन शेअर्सची खरेदी विक्री करू शकतात तर त्या ऑर्डर कोणकोणत्या असतात ते बघूया.
    • मार्केट ऑर्डर:-  मार्केट ऑर्डर म्हणजे प्रचलित बाजारभावाने सिक्युरिटी ची खरेदी आणि विक्री.म्हणजेच चालू मार्केटमध्ये जी किंमत असते त्याच किमतीची ऑर्डर ह्याला मार्केट ऑर्डर म्हणतात.हे ऑर्डर व्यापाराचे अंमलबजावणीची हमी देते परंतु विशिष्ट किंमत नाही.मार्केट ऑर्डर त्वरित अमलात आणल्या जातात.
    • लिमिट ऑर्डर:- याला मर्यादा ऑर्डर असेही म्हणतात तर लिमिट ऑर्डर म्हणजे एखाद्या विशिष्ट किमतीवर  सिक्युरिटीची खरेदी आणि विक्री करणारी सूचना.
      उदाहरणार्थ ;एका कंपनीचा शेअर जर 100 रुपयाला चालू असेल पण आपल्याला तो शेअर 100 रुपयाला नाही पाहिजे तो आपल्याला पाहिजे 99 रुपयाला तर आपण त्याची लिमिट ऑर्डर लावू शकतो जेव्हा तो शेअर 99 रुपयाला आला तेव्हा ती ऑर्डर प्लेस (place) होते आणि त्या शेअर्सची खरेदी होते तसेच घेतलेला शेअर आपल्याला जर 120 रुपयाला विकायचा असेल तर आपण लिमिट ऑर्डर 120 लावून तो विकू शकतो.लिमिट ऑर्डरमध्ये शेअर मार्केट विशिष्ट किमती पर्यंत पोहोचला किंवा ओलांडला तरच व्यापार चालवला जातो.
    • स्टॉप लॉस ऑर्डर:-  स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे आपल्या ट्रेड मध्ये कमीत कमी नुकसान स्वीकारून बाहेर पडण्याची सूचना. म्हणजेच आपलं नुकसान स्टॉप करा.स्टॉप लॉस ऑर्डर नुकसान मर्यादित करू देते म्हणजेच ही ऑर्डर वापरल्याने नुकसानाची शक्यता कमी होते. स्टॉप लॉस ऑर्डर चा महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रिगर प्राईज जेव्हा सुरक्षा किंमत ट्रिगर किमती पर्यंत पोहोचते तेव्हा स्टॉप लॉस ऑर्डर   ऍक्टिव्ह  केला जातो. स्टॉप लॉस ऑर्डर्सचे दोन प्रकार आहेत.
      • स्टॉप लॉस मार्केट ऑर्डर:- या प्रकारामध्ये एकदा ट्रिगर प्राईज गाठली की स्टॉप लॉस ऑर्डर चे मार्केट ऑर्डर मध्ये रूपांतर होते.
      • स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर:- या प्रकारात ट्रिगर प्राईज आणि लिमिट प्राईस हे असतात जेव्हा सुरक्षा किंमत ट्रिगर प्राईस पर्यंत पोहोचते तेव्हा स्टॉप लॉस ऑर्डर चे मर्यादा ऑर्डर मध्ये रूपांतर होते एकदा का ट्रिगर किंमत पोहोचली की स्टॉप लॉस ऑर्डर मार्केट ऑर्डर मध्ये रूपांतर होते.
    •  ट्रेलिंग स्टॉप ऑर्डर:- ही एक डायनामिक स्टॉक ऑर्डर आहे जी बाजारभावाच्या हालचालीवर आधारित आहे याचा वापर नका सुरक्षित करण्यासाठी किंवा तोटा मर्यादित ठेवण्यासाठी केला जातोजर बाजाराची किंमत मागच्या अंतराने उलटली तर ऑर्डर ट्रिगर होते आणि बाजार ऑर्डर  होते.
  7. क्लिअरिंग आणि सेटलमेंट:-  क्लिअरिंग आणि सेटलमेंट म्हणजे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील सिक्युरिटीज आणि निधीचे सुरळीत हस्तांतरण. क्लिअरिंग आणि सेटलमेंट ही प्रक्रिया ट्रेड पूर्ण झाल्यानंतर असते.क्लिअरिंग ही प्रक्रिया खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील व्यापाराच्या तपशिलाचा समिट आणि पुष्टी करण्याची प्रक्रिया आहे. क्लिअरिंग हे सामान्यतः क्लिअरिंग हाऊस किंवा क्लिअरिंग कार्पोरेशन द्वारे केली जाते. आणि सेटलमेंट ही खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील सिक्युरिटीज आणि निधी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये सिक्युरिटीची वास्तविक देवाण-घेवाण होते.इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर, डिलिव्हरी विरुद्ध पेमेंट(DVP), यासारख्या वेगवेगळ्या पद्धती द्वारे सेटलमेंट होऊ शकते.
  8. नियामक निरीक्षण:- भारतीय शेअर बाजार SEBI  द्वारे नियंत्रित केली जाते सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही एक नियामक संस्था आहे जे भारतीय शेअर मार्केट वर देखरेख करते. SEBI नियम तयार करते, बाजारातील खरेदी आणि विक्री यावर लक्ष ठेवते , गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करते, निष्पक्ष व्यापार पद्धती सुनिश्चित करते, बाजार मध्यस्तांचे नियमन करते आणि बाजार नियमांचे पालन करते.
  9. निर्देशांक:-  स्टॉक मार्केटमध्ये विविध निर्देशांक असतात जे विशिष्ट समभागांच्या कामगिरीची प्रतिनिधित्व करतात. जसे की निफ्टी50  आणि सेन्सेक्स हे भारतातील सर्वाधिक पॉप्युलर असे निर्देशांक आहेत. हे निर्देशांक शेअर मार्केटमध्ये एकूण कामगिरी मोजण्याचे आणि ट्रेंडचा मागोवा घेण्याचे काम करतात.

३. भारतीय शेअर मार्केटमध्ये कोणकोणत्या श्रेणीमध्ये (Categories) आपण ट्रेड करू शकतो?

भारतीय शेअर मार्केटमध्ये विविध श्रेणीमध्ये आपण गुंतवणूक किंवा ट्रेड करू शकतो येथे काही प्रमुख श्रेणी आहेत पुढील प्रमाणे:

  • इक्विटी ट्रेडिंग:- सार्वजनिक रित्या लिस्टेड कंपन्यांची शेअर खरेदी आणि विक्री इक्विटी ट्रेडिंग मध्ये स्टॉक एक्सचेंज वर होते. या श्रेणीमध्ये लार्ज कॅप, आणि स्मॉल कॅप या कंपन्यांचा समावेश असतो. भारतीय शेअर मार्केटमध्ये इक्विटी ट्रेडिंग  हा सर्वात कॉमन प्रकारचा व्यापार आहे.
  • डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग:- भारतीय शेअर मार्केटमध्ये डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग मध्ये फ्युचर्स अँड ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्टचा समावेश होतो जेथे व्यापारी अंतरनेहीत मालमत्ता म्हणजेच मूल्य स्टॉक, निर्देशांक, चलने किंवा कमोडिटीज यांच्या भावी किमतीच्या हालचालींवर अंदाज लावतात.
  • कमोडिटी ट्रेडिंग:’- कमोडिटी ट्रेडिंग मध्ये सोने, चांदी, कापूस, कच्चे तेल, वेगवेगळे कृषी उत्पादने इत्यादी सारख्या वस्तूंची खरेदी विक्री यांचा समावेश असतो. कमोडिटी ट्रेडिंग कमोडिटी एक्सचेंज द्वारे व्यापारासाठी एक व्यासपीठ प्रदान करते जसे की मल्टी कमोडिटी एक्सचेंज(MCX) आणि नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज( NCDEX).
  • करन्सी ट्रेडिंग:- हे परकीय चलन व्यापार म्हणून ओळखले जाते. यामध्ये विविध  करन्सीची खरेदी आणि विक्री होते. भारतात करन्सी ट्रेडिंग प्रामुख्याने जोड्यांमध्ये  केली जाते. उदाहरणार्थ; USD /INR, EUR/INR,इत्यादी चलन बाजार स्टॉक एक्सचेंजेस च्या चलन डेरिव्हेटिव्ह द्वारे चालतो.
  • IPO ट्रेडिंग:- इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ ट्रेडिंग मध्ये जेव्हा एखादी कंपनी प्रथमच लोकांसाठी शेअर ऑफर करते तेव्हा गुंतवणूकदार सदस्यत्व घेऊन त्या कंपनीचे शेअर विकत घेऊन नफा मिळवू शकतात.
  • म्युच्युअल फंड ट्रेडिंग:-  म्युच्युअल फंड ट्रेडिंग गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाच्या युनिटची खरेदी आणि विक्री करण्यास अनुमती देते. म्युच्युअल फंड अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात आणि स्टॉक,बाँड्सकिंवा इतर सिक्युरिटीच्या पोर्टफोलिओ मध्ये गुंतवणूक करतात.
  • एक्सचेंज ट्रेडेड फंड(ETF) ट्रेडिंग:- इतर कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे गुंतवणूकदार स्टॉक एक्सचेंज वर ईटीएफ युनिटची खरेदी आणि विक्री करू शकतात. ईटीएफ हे गुंतवणूक फंड आहेत ते निर्देशांक, क्षेत्रे, वस्तू किंवा इतर मालमत्ता वर्गांचा मागोवा घेऊ शकतात.

अशाप्रकारे आपण विविध ट्रेडिंग कॅटेगरीमध्ये ट्रेड करू शकतो पण शेअर मार्केट मधील विविध श्रेणीचे स्वतःचे नियम आणि जोखीम प्रोफाइल असतात गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये सहभागी होण्यापूर्वी प्रत्येक कॅटेगरीचे वैशिष्ट्ये आणि गतिशीलता पूर्णपणे समजून घेतली पाहिजे .गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे.

४. शेअर्स च्या किमती कुठल्या घटकांवर आधारित आहे.

शेअर मार्केट अनेक घटकांवर आधारित आहे जे त्याच्या कार्यावर परिणाम करतात आणि शेअर्सच्या किमती ठरवतात खाली काही प्रमुख घटक आहेत ज्यांच्यावर शेअर बाजार कार्य करतो.

  • पुरवठा आणि मागणी:-  म्हणजेच Supply and Demand हे शेअर मार्केटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते डिमांड आणि सप्लाय मुळे खरेदीदार आणि विक्रेते यांच्या परस्पर संवादामुळे शेअर्सच्या किमती प्रभावित होतात. जेव्हा एखाद्या स्टॉकची डिमांड त्याच्या सप्लाय पेक्षा जास्त असते तेव्हा किंमत वाढते आणि जेव्हा एखाद्या स्टॉकची डिमांड त्याच्या सप्लाय पेक्षा कमी असते तेव्हा किंमत कमी होते.
  • आर्थिक परिस्थिती:- वेगवेगळ्या आर्थिक परिस्थिती जसे कीGDP  वाढ, महागाई दर, व्याजदर, रोजगार  डेटा आणि ग्राहक भावना यासारख्या घटकांमुळे शेअर मार्केट वर परिणाम होतो.
  • कंपनीची कामगिरी :- वैयक्तिक कंपन्यांची आर्थिक कामगिरी आणि संभावना त्यांच्या शेअर्सच्या किमतीवर लक्षणीय परिणाम करतात महसूल वाढ, नफा, बाजारातील वाटा, व्यवस्थापन, परिणामकारकता आणि उद्योग कल यासारख्या घटकांचा कंपनीच्या मूल्याबद्दल आणि शेअर्सच्या किमती वर परिणाम होतो.
  • उद्योग आणि क्षेत्रातील ट्रेंड :- तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, वित्त किंवा ऊर्जा यासारख्या उद्योगांमधील बातम्या, घडामोडी आणि ट्रेन गुंतवणूकदारांच्या भावनांवर प्रभाव टाकू शकतात आणि विशिष्ट उद्योग किंवा क्षेत्रांच्या कामगिरीचा शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो.
  • गुंतवणूकदाराची भावना:- जर गुंतवणूकदाराची सकारात्मक भावना असेल जसे की सकारात्मक बातम्या, आशावादी दृष्टिकोन आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास या घटकांमुळे खरेदी क्रिया कल्प वाढवतेआणि शेअर्सच्या किमती वाढतात या उलट नकारात्मक भावनांमुळे विक्रीचा दबाव आणि किमती घसरतात.
  • जागतिक घटक :- जागतिक शेअर मार्केट मधील बातम्या आणि ट्रेंड ,तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा क्रियाकल्पांचा भारतीय शेअर मार्केटवर मोठा परिणाम होऊ शकतो. जागतिक घडामोडी, भूराजकीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणे आणि आर्थिक ट्रेन शेअर बाजारावर परिणाम करू शकतात.
  • नियामक  वातावरण:- नियामक  धोरणे, नियम आणि मार्गदर्शक तत्वे पारदर्शकता, न्याय पद्धती आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण असे नियामक वातावरण शेअर मार्केटच्या कार्यप्रणालीत आणि अखंडतेला हातभार लावतात. शेअर मार्केट हे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यासारख्या नियामक संस्थांनी सेट केलेल्या प्रेमवर्कमध्ये चालते.
  • मार्केट सायकॉलॉजी आणि वर्तणूक घटक:- मार्केट सायकॉलॉजी आणि वर्तवणूक घटक म्हणजेच भीती, लोभ, झुंड मानसिकता, बाजारातील सट्टा,असेच विविध घटक शेअर मार्केट वर प्रभाव टाकू शकतात. शेअर मार्केट मधील असे सामूहिक कृती आणि निर्णय, भावना शेअर्सच्या किमती आणि मार्केटमधील अस्थिरता यावर परिणाम करू शकतात.

अशाप्रकारे विविध घटक शेअर मार्केटवर वेळोवेळी त्यांचे महत्त्व आणि प्रभाव बदलू शकतात.

५. देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेअर बाजारावर कसा परिणाम होतो?

आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी महागाई वाढत आहे, नवीन कंपन्या उघडत आहेत तसेच नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. महामार्ग, मेट्रो, रुग्णालय आदी सुविधांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याचाच अर्थ की देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे आणि देशाची प्रगती होत आहे.

देशाची प्रगती झाली की त्या देशाचा शेअर बाजारही वाढतो. आणि यामुळेच आपल्याला गुंतवणुकीचे नवीन मार्ग खुले होत आहेत, बरेचसे लोक शेअर बाजारात सतत सहभागी होत आहेत. पूर्वीचे लोक फक्त सोने आणि एवढी पर्यंत मर्यादित होते पण आता स्टॉक , बॉंड आणि म्युचल फंड यामध्ये लोक पैसे गुंतवू लागले आहेत. या सर्वांचा शेअर बाजारावर परिणाम होतो. जसे की शेअर मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढते.

६. शेअर बाजाराची अस्थिरता (share market volatility)

शेअर मार्केटमध्ये अस्थिरता म्हणजेच होलेटीलिटी, तुम्हाला संबंधित स्टॉक किंवा निर्देशांक याच्याशी संबंधित जोखीमची कल्पना देत असते. जास्त अस्थिरता (volatility) म्हणजे जास्त धोका. कोणत्याही स्टॉक किंवा कोणत्याही गुंतवणूक उत्पादनाच्या किमतीमध्ये उच्च अस्थिरता असल्यास तो स्टॉक अत्यंत अस्थिर असा मानला जातो. जर तुमची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असेल तर तुम्ही त्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू शकतात.

७. शेअर मार्केट परतावा (share market returns)

कोणतीच गुंतवणूक अशी विशिष्ट परतावा देईल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही जसे की फिक्स डिपॉझिट किंवा गोल्ड. पण शेअर मार्केटमध्ये साधारण आपण किती परतावा घेऊ शकतो?  तर भारतीय शेअर मार्केटमध्ये लगबग 15% ते 18%पर्यंत परतावा मिळू शकतो.पण यामध्ये सुद्धा जर तुम्ही एक कॉलिटी पोर्टफोलिओ तयार केलेला असेल तर तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त परतावा मिळू शकतो याच्या उलट जर तुम्ही काही अभ्यास केला नसेल आणि अशाच एका कंपनीत गुंतवणूक केली असेल तर तुमचं नुकसान ही होऊ  शकते.

याशिवाय शेअर्समधील परतावा तुम्ही ज्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहात त्यावरही अवलंबून असते.जसे की एक क्षेत्र किफायतशील असेल तरी दुसऱ्याचे परिणाम होऊ शकतात खाली काही क्षेत्राचे वार्षिक परताव्याची माहिती दिलेली आहे.

Sectors Yearly Returns (%)
Banking Finance -0.32
Consumer Durables -5.52
Food and Beverages 16.49
Technology 26.57
Oil and Gas 14.66
Pharmaceuticals 1.18
Real Estate 17.17

 

अशाप्रकारे आपल्याला वार्षिक परतावा बघता येतो पण हे पूर्णपणे त्या सेक्टरची ग्रोथ वर अवलंबून असते त्यामुळे वर दिलेले सेक्टर तेवढाच परतावा देईल अशी गॅरंटी नसते.

2. शेअर मार्केटची वेळ (Share market timing)

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी काही गोष्टींची माहिती घेणे फार आवश्यक आहे जसे की

  • व्यवहाराची तारीख
  • सेटलमेंट तारीख

उदाहरणार्थ;जर इन्फोसिसचे 100 शेअर्स ,मंगळवारी 20 जून 2023 रोजी खरेदी केले  तर  व्यापाराला T+2 ( व्यापार दिवस+2  कार्य दिवस) सेटलमेंट सायकल मध्ये ठेवावे लागेल.  याचाच अर्थ असा आहे की तुम्ही खरेदी केलेले शेअर तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये दोन ट्रेडिंग दिवसानंतर म्हणजेच 22 जून 2023( या तारखांमध्ये स्टॉक मार्केट सुट्ट्या नाहीत असे गृहीत धरून) दिसून येतील. तुम्ही अशी ऑर्डर देत असल्यास तुम्हाला या सेटलमेंट चक्राबाबत सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे आणि तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये ते जमा करण्याची आवश्यकता आहे.

उदाहरणार्थ;  जर तुम्ही इंट्राडे ट्रेड करत असाल आणि दिवसाच्या अखेरी तुम्ही तुमची पोझिशन बंद करणार असाल  तर कोणतेही सेटलमेंट होणार नाही.

3.शेअर मार्केट सुट्ट्या (Share market Holidays)

शेअर मार्केट सामान्यतः सार्वजनिक सुट्ट्या आणि सुट्टीच्या दिवशी बंद असतो, जे राज्य किंवा केंद्रीय निवडणुकांवर आधारित असतात.

शेअर मार्केटने जाहीर केलेल्या काही सुट्ट्यांचा येथे एक झटपट आढावा घेऊया…

अ .क्र सुट्ट्या तारीख वार
1. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2023 गुरुवार
2. होळी 7 मार्च 2023 मंगळवार
3. रामनवमी 30 मार्च 2023 गुरुवार
4. महावीर जयंती 4  एप्रिल 2023 मंगळवार
5. गुड फ्रायडे 7  एप्रिल 2023 शुक्रवार
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2023 शुक्रवार
7. महाराष्ट्र दिन 1 मे 2023 सोमवार
8. बकरी ईद 28 जून 2023 बुधवार
9. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2023 मंगळवार
10. गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 मंगळवार
11. महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2023 सोमवार
12. दसरा 24 ऑक्टोबर 2023 मंगळवार
13. दिवाळी बली प्रतिपदा 14 नोव्हेंबर 2023 मंगळवार
14. गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर 2023 सोमवार
15. ख्रिसमस 25 डिसेंबर 2023 सोमवार

 

* मुहूर्त ट्रेडिंग 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळी लक्ष्मीपूजन ला होईल.  मुहूर्त ट्रेडिंग च्या वेळा नंतर सुचित केल्या जातात.

* एक्सचेंज वरीलपैकी कोणतीही सुट्टी बदलू शकते, ज्यासाठी आगाऊ एक स्वतंत्र परिपत्रक जारी केले  जाते.

निष्कर्ष (conclusion)

शेअर मार्केट हे असे ठिकाण आहे जिथे शेअरची खरेदी विक्री होते आणि हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी मध्यस्तांची किंवा दलालांची मदत घेतली जाते.

शेअर मार्केट हे एक अत्यंत असते बाजार आहे.

शेअर बाजार सेबी द्वारे नियंत्रित केला जातो.हे BSE आणि NSE द्वारे कार्य करते.

शेअर मार्केट हे चांगले व्यासपीठ आहे  गुंतवणूकदारांना परंतु यामध्ये खूप धोका सुद्धा आहेतर पूर्ण माहिती शिवाय किंवा अभ्यास न करता शेअर मार्केटमध्ये प्रवेश करू नका.

या पोस्टमध्ये शेअर मार्केट कसे काम करते यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे तरीसुद्धा जर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात.

आशा आहे की तुम्हाला शेअर मार्केट कसे काम करते याबाबतीत सगळी माहिती आवडली असेल जर तुम्हालाही ट्रेडिंग सुरू करायचे असेल तर त्यासाठी डिमॅट अकाउंट उघडावे लागेल त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मोफत डिमॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://sharemarketchiduniya.in
https://sharemarketchiduniya.in

 https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570

 

प्रश्न उत्तरे | FAQ

1.शेअर मार्केट म्हणजे काय?

उत्तर:  शेअर मार्केट हे एक इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे जिथे शेअर्सचे खरेदी आणि विक्री होते.

२.शेअर मार्केट कोण ऑपरेट करतो?

उत्तर:  शेअर मार्केटSEBI  ऑपरेट करतात पण काही लोक ऑपरेटर बनवून शेअर्सचे भाव अचानक वाढव किंवा कमी करू शकतात त्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ऑपरेटर लोकांपासून सावध राहावं लागेल.

३.थोडक्यात शेअर मार्केट काम कसे करते?

उत्तर:  शेअर मार्केटमध्ये रोज करोडो रुपयांची खरेदी आणि विक्री होते. करोडो लोक शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात ज्यामध्ये काही लोकांचा नफा होतो तर काही लोकांचा तोटा होतो हे असे रोज चालू असते आणि अशा प्रकारे शेअर मार्केट निरंतर चालत राहते.