ट्रेडिंग म्हणजे काय? What is Trading?

ट्रेडिंग म्हणजे काय? What is Trading?
आतापर्यंत तुम्ही शेअर मार्केट बद्दल बरीच माहिती जाणून घेतली असेल जसे की शेअर म्हणजे काय?, शेअर मार्केट म्हणजे काय?, शेअर मार्केट कसे काम करते?, वगैरे. तर आज आपण जाणून घेऊया शेअर मार्केट मधील ट्रेडिंग बद्दल सखोल माहिती जसे कि ट्रेडिंग म्हणजे काय?, ट्रेडिंगचे विविध प्रकार, ट्रेडर म्हणजे काय? इत्यादी.
1.ट्रेडिंग म्हणजे काय? What is Trading?
पूर्वीच्या काळात लोकांकडे जेव्हा कुठलेही पैसे किंवा कोणतेही चलन नव्हते. त्यावेळेस ते आपल्याकडील एखादी वस्तू देऊन दुसरी एखादी वस्तू घेत होते, या प्रोसेसला ट्रेडिंग असे म्हणतात. ट्रेडिंग याचा मराठीत अर्थ व्यापार किंवा व्यवसाय किंवा खरेदी विक्री किंवा व्यवहार हा आहे.
तर शेअर मार्केटच्या भाषेत, कमी किमतीतला शेअर काही काळानंतर (दिवसानंतर) जास्त किमतीत विकणे आणि त्यातून प्रॉफिट मिळवणे याला ट्रेडिंग असे म्हणतात.
हा एक प्रकारचा व्यापारच आहे म्हणून जो व्यक्ती एखादी वस्तू खरेदी करून त्याची विक्री करतो त्याला व्यापारी असे म्हणतात तसेच शेअर मार्केटमध्ये त्याला ट्रेडर असे म्हणतात.
ट्रेडिंग हि स्टॉक एक्स्चेंज, कमोडिटी एक्सचेंज आणि परकीय चलन बाजार यासह विविध प्लॅटफॉर्मवर होते .
शेअर ट्रेडिंग किंवा स्टॉक ट्रेडिंग हा ट्रेडिंग च्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. यामध्ये स्टॉक एक्सचेंज वर सूचीबद्ध केलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री होते. ट्रेडर ब्रोकरेज खात्याद्वारे शेअर मार्केटमध्ये प्रवेश करू शकतात, जिथे ते शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात.
2.ट्रेडिंग चे प्रकार / Types Of Trading
वरती सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखादा शेअर तुम्ही काही कालावधीसाठी होल्ड करतात त्या कालावधीनुसार ट्रेडिंगचे काही महत्त्वाचे प्रकार पडतात.
- इंट्राडे ट्रेडिंग
- स्विंग ट्रेडिंग
- स्काल्पर ट्रेडिंग
- पोझिशनल ट्रेडिंग
- लॉन्ग टर्म ट्रेडिंग
- हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग
- अल्गो रीथमिक ट्रेडिंग
तर आपण जाणून घेऊया यांची माहिती.
- इंट्राडे ट्रेडिंग :– तुम्ही खरेदी केलेला एखादा शेअर त्याच दिवशी शेअर मार्केटचा timing संपण्या अगोदर म्हणजेच ३.३०च्या अगोदर विकणे याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात.
- स्विंग ट्रेडिंग:– एखादा शेअर काही दिवसांसाठी होल्ड करून नंतर विकणे त्या प्रक्रियेस स्विंग ट्रेडिंग म्हणतात. या ट्रेडिंगचा कालावधी काही दिवसापासून ते काही आठवड्यांपर्यंत असू शकतो. या ट्रेडिंगसाठी ट्रेडर्सला पूर्ण वेळ शेअर मार्केटचा आढावा घेण्याची गरज नसते. ज्यांना अजिबात वेळ नाही त्या ट्रेडर्स ना स्विंग ट्रेडिंग खूप चांगला पर्याय आहे.
- स्काल्पर ट्रेडिंग:– ट्रेडिंगचा हा प्रकार जोखीमयुक्त असतो कारण की यामध्ये खरेदी केलेले शेअर काही सेकंद किंवा काही मिनिटानंतर विक्री करतात. नवीन ट्रेडर्स ना याचा वापर करताना जास्त काळजी घ्यावी लागते. शक्यतो नवीन ट्रेडर्सनी स्कल्पिंग (scalping)करूच नये. सहसा मोठमोठे ट्रेडर्स ही ट्रेडिंग सिस्टीम वापरतात आणि या ट्रेडिंगमध्ये ट्रेड ची रक्कम खूप मोठी असते.
- पोझिशनल ट्रेडिंग:– या ट्रेडिंगमध्ये शेअर होल्डिंग पिरेड ( कालावधी) काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत असतो पण जास्तीत जास्त एका वर्षाच्या आत हा शेअर विकला गेला पाहिजे त्याला पोझिशनल ट्रेडिंग असे म्हणतात.
- लॉन्ग टर्म ट्रेडिंग:– लॉंग टर्म ट्रेडिंग म्हणजे एखादा शेअर एका वर्षापेक्षा जास्त होल्ड करणे. यामध्ये कालावधी पाच-सहा वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकतो. सहसा गुंतवणूकदार हा ट्रेडिंग प्रकार निवडतात यामध्ये तुम्हाला कंपनीचा डिव्हीडंट किंवा कंपनीने जाहीर केलेले बोनस शेअर तसेच शेअरच्या किमती मधील वाढ या सर्व गोष्टींचा फायदा होतो. पण लॉन्ग टर्म ट्रेडिंग करताना कंपनीचा चांगला अभ्यास करून मगच करावी.
- हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग:– हा ट्रेडिंग चा प्रकार जास्त लोकांना माहिती नाही कारण यामध्ये खूप जास्त वेगाने मोठ्या प्रमाणात व्यवहार होतो. हा एक अल्गोरिदमिक ट्रेडिंगचा प्रकार आहे.
- अल्गोरिदमिक ट्रेडिंग:– अल्गोरिदमिक ट्रेडिंग एक ऍडव्हान्स ट्रेडिंग म्हणून ओळखली जाते, हा ट्रेडिंग चा नवीन प्रकार आहे. याला ऑटोमेटेड ट्रेडिंग किंवा अल्गो ट्रेडिंग सुद्धा म्हणतात. यामध्ये कॉम्प्युटर राईज (computerized) नियम आणि पॅरामिटर आधारे ट्रेडिंग करतात. ही ट्रेडिंग सिस्टीम तांत्रिक विश्लेषण (technical analysis), मार्केट डेटा(market data) आणि गणितीय मॉडेल्स (algorithm)वर अवलंबून असते.
3.ट्रेडिंग कशी करावी? / How to Trade ?
आजकाल घरी बसून ट्रेडिंग करणे खूप सोपे झाले आहे. लोक मोबाईलवरून ऑनलाइन ट्रेडिंग करून दररोज लाखो रुपये कमवत आहेत. यापैकी काही लोक शेअर मार्केटमध्ये equity मध्ये, काही कमोडिटी किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात आणि काही लोक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये देखील ट्रेडिंग करतात.
याचाच अर्थ, जर तुम्ही शेअर मार्केट चा चांगला अभ्यास करून, ट्रेडिंग करायला शिकलात तर तुम्हीही घरी बसून लाखो रुपये कमवू शकता. पण ट्रेडिंग करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही.
खर तर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे, डीमॅट खाते, ट्रेडिंग खाते आणि बँक खाते. जेव्हा तुमच्याकडे या तिन्ही गोष्टी असतील, तेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग करू शकता.
खाली काही सोप्या स्टेप्स दिल्या आहेत ज्याद्वारे तुम्ही शेअर मार्केटमध्ये सहजपणे ट्रेडिंग करू शकता,
1. चांगला ब्रोकर निवडा
ट्रेडिंग साठी तुम्हाला योग्य ब्रोकर निवडणे खूप गरजेचे आहे. कारण जर तुम्ही चुकीचे ब्रोकर निवडले तर तुमचे ट्रेडिंगमध्ये नुकसान होउ शकते. तुम्हाला माहिती आहेच की, आजकाल ऑनलाइन ट्रेडिंगचे युग आहे, म्हणूनच ऑनलाइन ब्रोकिंग अॅप्स देखील ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहेत जसे Dhan, Zerodha, Upstox, Angel broking, 5 Paisa इ.
मोफत डि-मॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570
2. डी-मॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा
ट्रेडिंग करण्यासाठी तुमचे डी-मॅट आणि ट्रेडिंग खाते असायला पाहिजे.
डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते –
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खाते
- मोबाईल क्रमांक
- ईमेल आयडी
3. ट्रेडिंगसाठी बँक खाते लिंक करा
ट्रेडिंग सुरु करण्यासाठी तुमचे डी-मॅट आणि ट्रेडिंग खाते बँकखात्याशी लिंक करावे लागेल. बँक खाते लिंक झाल्यावर ट्रेडिंग साठी तुम्ही डी-मॅट अकाउंटमध्ये फंड add करू शकता.
4.ट्रेडिंग करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्ष्यात ठेवा
नवीन ट्रेडर्स शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना अनेक चुका करतात ज्यामुळे त्यांना सुरुवातीला खूप पैसे गमवावे लागतात. पण जर तुम्ही त्या सर्व चुकांमधून अगोदरच शिकलात, तर तुम्ही ट्रेडिंगमधील तुमचे नुकसान वाचवू शकाल.
म्हणूनच ट्रेडिंग करण्यापूर्वी तुम्ही खालील गोष्टी लागू केल्या पाहिजेत जसे-
१. स्वतःला शिक्षित करा
ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण तसेच fundamental विश्लेषण माहिती पाहिजे. शेअर मार्केट चा अभ्यास करा.
२. ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस अवश्य लावा.
ट्रेडिंग करताना प्रत्येक ट्रेडरने स्टॉप लॉस सेट करणे फार महत्वाचे आहे. स्टॉप लॉस ठेवणे म्हणजे तुम्ही तुमचे नुकसान मर्यादित करणे.
३. कमी व्हॉल्यूमचा स्टॉक ट्रेड करू नका.
कमी व्हॉल्यूमचा स्टॉक म्हणजे या शेअर मध्ये जास्त खरेदी आणि विक्री होत नाही.असे शेअर्स खरेदी केल्यानंतर तुम्हाला ते विकण्यात अडचण येईल, त्यामुळे या प्रकारच्या शेअर्सपासून नेहमी दूर राहा.
४. तुमची सर्व कमाई ट्रेडिंगमध्ये लावू नका.
तुम्ही जर नवशिखे असाल तर तुमचे सर्व पैसे ट्रेडिंग मध्ये लावू नका कारण यामध्ये तुमचे जास्त नुकसान होऊ शकते. ट्रेडिंग सुरु करायला पहिले कमी पैसे गुंतवा नन्तर जसे जसे तुम्हाला नफा होत जाईल त्याप्रमाणे तुम्हीपैसे गुंतवून त्यामध्ये रिस्क घेवू शकता.
५. कधीही कर्ज घेऊन ट्रेडिंग करू नका
दुसऱ्यांचा पैसा घेवून तुम्ही कधी ट्रेडिंग करू नका. कारण आपल्याला ते नेहमी दडपण असते कि आपल्याला नुकसान व्यायला नको आपल्याला पैसे परत करायचे आहे असे. पण या दडपणामुळे आपली ट्रेडिंग psychology बिघडते आणि आपले नुकसान होऊ शकते.
६. डेमो ट्रेडिंग अकाउंट वर सराव करा
तुम्ही ट्रेडिंग ची practice डेमो अकाउंट ने करू शकता ज्यामुळे तुम्हाला रिअल फंड धोक्यात येणार नाही.
७. ट्रेडिंग सेट अप तयार करा
तुम्ही तुमच्या स्वताच्या अभ्यासावर ट्रेडिंग सेट अप तयार करा करा. जे तुम्हाला ट्रेड मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दर्शवेल.
5.ट्रेडिंग चे फायदे आणि नुकसान
दिसायला आणि करायला ट्रेडिंग जरी सोपी वाटत असेल तरी ट्रेडिंग करणे एवढे सोपे नाही. जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर ट्रेडिंग मधील काही नियम पाळावेच लागतील.
कारण फक्त फायदे आणि नुकसान वरून आपण काहीही ठरऊ शकत नाही.
ट्रेडिंग चे फायदे
१. ट्रेडिंग करून तुम्ही कमी वेळात जास्त पैसे कमवू शकतात.
२. ट्रेडिंग शिकायला तुम्हाला प्रोफेशनल डिग्री ची गरज नाही.
३. ट्रेडिंग मध्ये तेवढेच नुकसान आहे जेवढे तुम्ही पैसे लावतात पण प्रॉफिट अनलिमिटेड आहे.
४. तुम्ही घरी बसून मोबाईल द्वारा ट्रेडिंग करून लाखो रुपये कमवू शकतात ट्रेडिंगसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.
ट्रेडिंग चे नुकसान
१. ट्रेडिंग मध्ये जेवढे लोक कमवतात त्याच्या दुप्पट गमावतात. म्हणजे ट्रेडिंग मध्ये तुमचा सर्व पैसा जाऊ शकतो जर तुम्हाला त्याबद्दल काहीच ज्ञान नसेल तर. यासाठी त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
२. जर तुम्ही मार्जिन घेऊन ट्रेड करत असाल तर तुमची रिस्क अजून वाढते आणि तुमचे यामध्ये नुकसान होऊ शकते.
३. ट्रेडिंग करताना जर तुम्ही स्टॉप लॉस लावला नाही तर तुमचं पूर्ण कॅपिटल झिरो होऊ शकते.
४. जास्त ट्रेडिंग केल्यास तुम्हाला जास्त ब्रोकिंग चार्जेस लागू शकतात त्यामुळे तुमचे प्रॉफिट कमी आणि नुकसान जास्त होऊ शकते.
6.ट्रेडिंग कशी शिकावी
१. ट्रेडिंग शिकण्यासाठी तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन कोर्स करू शकतात. आज काल शेअर मार्केट बद्दल खूप सारे कोर्सेस उपलब्ध आहेत ते तुम्ही जॉईन करू शकतात.
२. युट्युब वरून तुम्ही शेअर मार्केट बद्दल अनेक साऱ्या नवनवीन गोष्टी फ्री मध्ये शिकू शकतात यूट्यूब हा एक सर्वोत्तम मार्ग आहे जिथून तुम्ही विनामूल्य ट्रेडिंग शिकू शकतात.
३. शेअर मार्केट बद्दल विविध पुस्तके वाचून तुम्ही ट्रेडिंग शिकू शकतात. आज काल ई-बुक्स सुद्धा उपलब्ध आहेत हे वाचून तुम्ही सहजपणे ट्रेडिंग आत्मसात करू शकतात.
निष्कर्ष
ट्रेडिंग हा शेअर मार्केट चा सामान्य प्रकार असून, अतिशय गतिमान आणि उत्साहवर्धक प्रयत्न आहे. जो गुंतवणूकदारांचे उद्धिष्ट पूर्ण करण्याची संधी देतो.
ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला सतत शिकत राहणे महत्वाचे आहे . तसेच ट्रेडिंग करताना शिस्त आणि भावनिक नियंत्रण गरजेचे आहे.
प्रश्नोत्तरे
१. ट्रेडिंग कशी शिकावी?
उत्तर: ट्रेडिंग करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला टेक्निकल अनालिसिस वर लक्ष द्यावे लागेल; तसेच चार्ट पॅटर्न याचा अभ्यास करावा लागेल, विविध इंडिकेटर आणि सपोर्ट रेजिस्टन्स याबद्दल माहिती जाणून घ्यावी लागेल.
२. नवीन लोकांसाठी सर्वात चांगली ट्रेडिंग कोणते आहे?
उत्तर: जर तुम्ही नवशिके ट्रेडर असाल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंगने सुरुवात करू शकतात. स्विंग ट्रेडिंग मध्ये रिस्क कमी असते त्यामुळे स्विंग ट्रेडिंग सर्वात चांगली आहे.
३. ट्रेडिंग मध्ये एक्सपर्ट कसे बनावे?
उत्तर: शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये एक्सपर्ट बनण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला अनुभव चांगला येईल आणि एक दिवस तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल.