शेअर म्हणजे काय ? What is Share ?

अनुक्रमाणिका hide
1 1.शेअर म्हणजे काय ? What is Share ?

1.शेअर म्हणजे काय ? What is Share ?

आधीच्या पोस्टवरून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेअर बाजार मध्ये शेअर्स खरेदी आणि विक्री केली जातात, पण नक्की शेअर म्हणजे काय असते? !!! या पोस्टमध्ये शेअर म्हणजे काय? What is Share? शेअर्सचे किती प्रकार असतात, स्टॉक आणि शेअर मध्ये काय अंतर असतं, शेअर खरेदी करायचे काय फायदे असतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. 

शेअर म्हणजे काय ?
शेअर म्हणजे काय ?

 

शेअर म्हणजे भाग जेव्हा एखादी कंपनी लोकांना मालकी देऊन भांडवल उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा ती शेअर्स किंवा स्टॉक जारी करते आणि जेव्हा गुंतवणूकदार त्या कंपनीचे शेअर्स घेतात म्हणजे ते त्या कंपनीचे शेअर होल्डर किंवा भागधारक बनतात. हे आपण अगोदरच्या पोस्टमध्ये जाणून घेतले. चला तर मग जाणून घेऊया शेअर म्हणजे काय ?

शेअर म्हणजे भाग किंवा हिस्सा. जेव्हा तुम्ही कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे शेअर होल्डर किंवा भागधारक बनतात. शेअर्सची किंमत XYZ  काही पण असू शकते. ज्या व्यक्तीकडे कंपनीचे सर्वात जास्त शेअर्स असतात त्या व्यक्तीचा  कंपनीवर मालकी हक्क सर्वात जास्त असतो.

1.शेअर म्हणजे काय ? What is share ?

कंपनीच्या  मालकीच्या सर्वात छोट्या हिस्स्याला किंवा भागाला शेअर असे म्हणतात.

शेअर ची व्याख्या (Definition of share)

  • शेअर हा एखाद्या कंपनीचा हिस्सा खरेदी करण्याचा एक मार्ग आहे ज्याद्वारे कोणताही गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करून त्या कंपनीमध्ये हिस्सा घेऊ शकतो, म्हणजेच त्या कंपनीचा पार्टनर होऊ शकतो. 

शेअर चे उदाहरण (Example of share)

समजा – ABC लिमिटेड कंपनीचे एकूण शेअर 10000 आहेत आणि प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपये आहे, तर ABC लिमिटेड कंपनीचे एकूण भागभांडवल 10000×10 = रुपये 100000 असेल.

आता तुम्ही या कंपनीचे 20 शेअर्स विकत घेतल्यास म्हणजेच तुम्ही एकूण पैसे 20×10 = 200 रुपये गुंतवले आहेत.

काही काळानंतर ABC Ltd ला एका मोठ्या कंपनीकडून मोठी ऑर्डर मिळते ज्यामुळे त्याच्या शेअरची किंमत रु. 10 ते रु. 30 पर्यंत वाढते.

कारण तुम्ही 20 शेअर्स विकत घेतले ज्यांचे मूल्य आता रुपये 20×30 = 600 रुपये आहे तर तुम्ही 20 शेअर्स 200 रुपये प्रति शेअर 10 या दराने खरेदी केले, म्हणजे शेअर्सच्या किमतीत वाढ झाल्यामुळे तुम्हाला 600-200 = 400 रुपये नफा झाला.

पण हा नफा तुमच्या बँक खात्यात तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही शेअर्स विकता. कारण जर तुम्ही शेअर विकला नाही तर काही काळानंतर शेअरची किंमत पुन्हा खाली येण्याची शक्यता असते. 

आता तुम्हाला शेअर म्हणजे काय याबद्दल समजले असेल पण कंपन्या त्यांचे शेअर का विकतात किंवा का जारी करतात ते आता जाणून घेऊ.

2.कंपन्या त्यांचे शेअर्स विकण्यासाठी का जारी (issue) करतात?

कंपन्या त्यांचे शेअर्स जारी करतात कारण की त्यांना त्यांचा बिजनेस वाढवण्यासाठी पैशांची गरज असते, जर कंपन्यांनी बँकेतून लोन घेतले तर ,त्याचे व्याज त्यांना द्यावे  लागते पण तेच कंपनी त्यांचे शेअर्स लोकांना विकत देते म्हणजे त्यांच्या कंपनीमधील हिस्सेदारी देते आणि त्यासाठी त्यांना कुठलेही व्याज द्यावे लागत नाही.

उदाहरणार्थ:– समजा तुमची एक कंपनी आहे आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय देशभरात पसरवायचा आहे तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे ज्यासाठी तुम्हाला दहा नवीन शॉप उघडायचे आहेत पण त्यासाठी तुम्हाला पन्नास लाख रुपयांची गरज आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कंपनीसाठी तीन प्रकारे पैसे उभे करू शकतात.

1) तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला, तुमच्या घरच्यांना किंवा नातेवाईकांना पैसे उधार  देण्यास सांगता पण तसे कोणीही तेवढे पैसे देत नाही.

2)तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला दरवर्षी व्याज भरावे लागते मग तुमचा व्यवसाय वाढू किंवा ना वाढू तुम्हाला व्याज भरावेच लागते.

3)तुमची कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध करणे आणि आणि लोकांना शेअर विकून पैसे उभे करणे.

तर या तिघांपैकी सर्वात चांगला मार्ग म्हणजे कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध करून म्हणजेच लिस्ट करून पैसे उभारणे कारण यामध्ये तुम्हाला दरवर्षी व्याज द्यावे लागत नाही आणि लोकांना दुसऱ्यांकडे पैसे मागायची सुद्धा गरज नाही. 

पण लक्षात ठेवा शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी कंपन्यांना त्यांचे कमीत कमी 25% शेअर्स जारी करावे लागतात आणि उर्वरित 75% शेअर प्रमोटर्स कडे असतात. या 25% शेअर्समध्ये एक वाटा किंवा शेअर किती रुपयाचा आहे ?तर प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची किंमत वेगवेगळी असते, त्यामुळे एक शेअरची किंमत किती आहे हे तुम्ही सांगू शकत नाही हे सर्वस्वी त्या कंपनीवर अवलंबून असते.

3.शेअर कसे खरेदी करतात? How to buy shares?

शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी अगोदर आपले स्वतः चे डिमॅट अकाउंट ओपन करावे लागते. तुम्ही Dhan, Zerodha, Angel broking डिमॅट खाते उघडू शकतात.

मोफत डिमॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570

डिमॅट खाते उघडल्यावर तुम्हाला तुमचे बँक खाते डिमॅट खात्याशी लिंक करावे लागते. यानंतर तुम्ही तुमचे पैसे डिमॅट खातात टाकू शकता जेणेकरून तुम्हाला शेअर्स खरेदी करता येतील. मग तुमच्या ब्रोकर ॲप वर जाऊन ज्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला खरेदी करायचे आहे त्या कंपनीचं नाव सर्च बॉक्समध्ये टाकून सर्च करू शकता.खरेदी किंवा बाय (Buy) या बटनावर क्लिक करून तुम्ही सहज शेअर्स खरेदी करू शकतात. 

काही दिवसानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल की शेअर्सची किंमत वाढली आहे तेव्हा ते तुम्ही शेअर विकू शकतात आणि त्यातून नका मिळवू शकतात. 

4.शेअर्स चे प्रकार (Types of shares) 

शेअर्सचे अनेक प्रकार आहेत त्याच्यातले काही प्रकार आपण थोडक्यात बघू.

  •  कॉमन  शेअर- याला कॉमन स्टॉक किंवा सामान्य शेअर कसे म्हणतात हे शेअर कंपनीमध्ये मालकीचे प्रतिनिधित्व करतात. लिक्विडेशनच्या स्थितीत मालमत्ता मिळवण्यासाठी सामान्य भागधारक शेवटच्या रांगेत असतात.याला इक्विटी शेअर असेही म्हणतात. 
  •  प्रिफर्ड शेअर–  या शेअर्सला सामान्य शेअर्स पेक्षा जास्त प्राधान्य असतं. यांना निश्चित लाभांश दर असतो. लिक्विडेशनच्या बाबतीत सामान्य भागधारकांपेक्षा प्राधान्यकृत भागधारकांचा  कंपनीच्या मालमत्तेवर जास्त दावा असतो.याला प्रेफरन्स शेअर्स असेही म्हणतात. 
  • नॉन वोटिंग शेअर- काही कंपन्या मतदानाच्या अधिकाराशिवाय शेअर्स जारी करतात म्हणून त्यांना मतदानाचे विशेष अधिकार देत नाहीत.
  •  ड्युअल-  क्लास  शेअर– काही कंपन्यांचे शेअर्सचे वेगवेगळे वर्ग असू शकतात भिन्न मतदान अधिकारासह या संरचनेला ड्युअल-क्लास शेअर असे म्हणतात.याला DVR शेअर म्हणजेच डिफरन्सिअल वोटिंग राइट्स शेअर असे म्हणतात.
  •  रिडीम करण्यायोग्य शेअर- असे शेअर जे परत विकत घेतले जाऊ शकतात  आणि जारी करणारी कंपनी पूर्व निश्चित किमतीवर किंवा विशिष्ट तारखेला परत मिळू शकतात. हे शेअर सामान्य नसतात.
  •  ग्रोथ शेअर– हे शेअर्स भविष्यातील कंपनीच्या  वाढीच्या अपेक्षेने जारी केले जातात .याला बोनस शेअर असे म्हणतात हे असे शेअर्स असतात जे कंपनीच्या शेअर होल्डर्स ना अतिरिक्त शेअर मध्ये मिळतात.
  •  प्लेज शेअर – तारण शेअर हे असे शेअर्स आहेत ज्यामध्ये भागधारक आपले शेअर्स तात्पुरते तृतीय पक्षाला देतो. शेअर्स सहसा कर्जासाठी तारण म्हणून ठेवले जातात. याद्वारे, कर्ज देणाऱ्या व्यक्तीला शेअर्सचा योग्य वापर करण्याची संधी मिळते आणि भागधारकही त्याच्या शेअरच्या मूल्याचा लाभ घेऊ शकतात.
  • आऊटस्टँडिंग शेअर:- आऊटस्टँडिंग शेअर म्हणजे थकबाकी शेअर. म्हणजे कोणत्याही कंपनीचे मार्केटमध्ये किती शेअर्स उपलब्ध आहेत. असे शेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी कंपनीच्या कॅपिटल ला म्हणजे भांडवल ला  शेअर्सच्या किमतीने भागले जाते. 
    •           आऊटस्टँडिंग शेअर चा फॉर्मुला खालील प्रमाणे:-
                आऊटस्टँडिंग शेअर = कंपनीचे भांडवल/  शेअरचे मूल्य. 
  •  पेनी शेअर:- पेनी शेअरची किंमत खूप कमी असते. जसे की रु 1, रु 5 किंवा रु 10.अशा प्रकारे असते.या शेअरमध्ये केलेली गुंतवणूक ही उच्च जोखीम आणि उच्च पुरस्काराशी संबंधित असते. पेनी शेअर मध्ये वाढीची क्षमता आणिकंपनीची आर्थिक स्थिरता कमी होण्याची शक्यता असते. 

5.शेअर बाय- बॅक म्हणजे काय? (what is mean by share buyback?)

शेअर बाय- बॅक म्हणजे एखादी कंपनी स्वतःचे आऊटस्टँडिंग शेअर मार्केट मधून खरेदी करते. यामुळे कंपनीची मालकी आणि मूल्य वाढते. जेव्हा एखादी कंपनी बायबॅक करते तेव्हा ते कंपनीच्या प्रमोटर्स चा त्यांच्या कंपनीवरील विश्वास दर्शवते.

6.स्टॉक आणि शेअर मध्ये काय फरक असतो? (what is the difference between stock and share?)

स्टॉक आणि शेअर मध्ये कुठलाही फरक नसतो कारण या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे.

7.प्रेफर शेअर आणि इक्विटी शेअर  यामधील फरक.(difference between preferred share and equity share)

 

प्रेफर शेअर 

इक्विटी शेअर

1.प्रेफर शेअर म्हणजे असे शेअर ज्यामध्ये शेअर होल्डर्स ना डिवीडन पेमेंट आणि मालमत्तेच्या वितरणामध्ये पहिले प्राधान्य मिळते. 1.इक्विटी शेअर्स हे सामान्य स्वरूपात असतात म्हणजे याला कॉमन शेअर असेही म्हणतात यामध्ये कंपनीच्या नफ्यानुसार शेअर होल्डर्स ना पैसे दिले जातात.
2.प्रेफरन्स शेअर निश्चित लाभांश दर देतात. 2.इक्विटी शेअर्स कंपन्यांची नफ्याची टक्केवारी देतात.हे अनिश्चित लाभांश दर देतात.

8.शेअर्स चे फायदे ( Advantages of shares)

१.शेअर होल्डर्स ला काही अधिकार आहेत जसे की कंपनीच्या निर्णयांमध्ये मतदान करणे, लाभांश प्राप्त करणे अनेक कंपनीच्या वाढीमध्ये आणि नफ्यात भाग घेणे.

२.शेअरची किंमत काही घटकांवर अवलंबून असते जसे की कंपनीची आर्थिक कामगिरी, बाजाराची परिस्थिती आणि गुंतवणूकदारांच्या भावना तसेच पुरवठा (supply) आणि मागणीची (demand) गतिशीलता etc.

३.कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे शेअर  होल्डर्स  ना त्याचा बऱ्यापैकी फायदा होतो जसे की  कंपनीच्या मालकी आणि वाढीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, शेअर्सची किंमत वाढल्याने शेअर होल्डर्स ना नफ्याचा फायदा होतो., काही कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही भाग शेअर होल्डर्सना वितरित करतात.

४.शेअर मार्केट मधील कंपनीचे शेअर्स नियमितपणे खरेदी करून संपत्ती निर्माण करू शकतात.

५.वेगवेगळ्या कंपनीचे शेअर खरेदी करून तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू शकतात.

६.स्टॉक मार्केटमध्ये जर तरलता (liquidity) असेल तर कोणताही शेअर खरेदी आणि विक्रीसाठी उपलब्ध असतात.

7.तुम्हाला  शेअर होल्डिंग आणि विक्री सह कर लाभ मिळतो.

8.जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये कोणत्याही ब्ल्यूचीप कंपनीचे शेअर खरेदी केले तर तुम्हाला एफ डी पेक्षा चांगला परतावा मिळतो.

9.शेअर्स चे नुकसान (Disadvantages of shares)

1.शेअर मार्केट मध्ये शेअर ची किंमत कमी जास्त होतं असते, जर ग्लोबल मार्केट खाली असेल तर तुमचा पोर्टफोलिओ देखील खाली जाईल यामध्ये तुमचे नुकसान होण्याची जोखीम असते.

२.कंपनीचा स्टॉक १००% वर जाईल याची तुम्ही खात्री बाळगू शकत नाही.

३.शेअर मार्केट मधील अनिश्चितता (volatility) यामुळे शेअर्सच्या किमतीत अचानक बदलली आणि यामुळे गुंतवणूकदाराला नुकसान होऊ शकते.

4.कंपनीचा लाभांश आणि नफा  कंपनीच्या धोरणानुसार दिला जातो आणि याची खात्री नसते.

निष्कर्ष | Conclusion    (Share meaning in marathi | शेअर  म्हणजे काय?)

या पोस्टमध्ये, मी तुम्हाला शेअर म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की आता तुम्हाला शेअरचा अर्थ काय आहे, शेअर्सचे प्रकार काय आहेत आणि शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्रीचा अर्थ काय आहे हे तुम्हाला कळले असेल.

प्रश्न उत्तरे | FAQ

1.शेअर म्हणजे काय?
उत्तर :-शेअर म्हणजे भाग किंवा हिस्सा. जेव्हा तुम्ही कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे शेअर होल्डर किंवा भागधारक
बनतात.

2.
भारतातील सर्वात महाग स्टॉक कोणता आहे?
उत्तर :टायर बनवणाऱ्या एमआरएफ कंपनीचा भारतातील सर्वात महाग स्टॉक आहे. त्याच्या एका शेअरची किंमत सुमारे 92000 रुपये आहे.

Leave a Comment