शेअर मार्केट हा एक सार्वजनिक व्यापार आहे ज्यामध्ये विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो. शेअर मार्केट हे संधी देत लहान-मोठे गुंतवणूकदारांना विविध व्यवसायांच्या मालकीमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांच्या यशातून नफा मिळवण्यास.
मी तुम्हाला शेअर मार्केट ची ओळख करून देणार आहे कारण शेअर मार्केट हे लवकरात लवकर पैसे कमवण्याचं आणि आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याचे एक आकर्षक साधन आहे, पण हे तेवढेच गुंतागुंतीचे असे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये जोखीम पण आहे याच कारणामुळे शेअर बाजाराचे काळजीपूर्वक विश्लेषण आणि निर्णय घेण्याची क्षमता खूप महत्त्वाची ठरते.
शेअर मार्केट हा जुगार नसून एक व्यवसाय आहे ज्यामध्ये जोखीम असते आणि ही जोखीम कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या धोरणांवर चर्चा करणार आहोत .शेअर बाजारात तुम्ही एक अनुभवी गुंतवणूकदार असाल किंवा नवखे असाल तरी हा ब्लॉग तुमच्या ज्ञानात भर टाकणारा असेल आणि माहितीपूर्ण गुंतवणूक आणि निर्णय घेण्यात मदत करेल.
शेअर बाजार हे एक नेहमी गतिमान आणि विकसित असे क्षेत्र आहे त्यामुळे सातत्याने शिकणे आणि आपल्या ज्ञानात भर पाडणे हे आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. तर आमच्या या ज्ञान प्रदान करणाऱ्या ब्लॉगमध्ये सामील व्हा.
शेअर बाजाराचे विश्लेषण, त्याची गुंतवणूक, त्याची विविध पैलू आणि त्याची संकल्पना हे जाणून घेण्यासाठी हा आपण ब्लॉग तयार केलेला आहे . तसेच शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी आणि त्यातून योग्य रीतीने पैसे कसे कमवावे हे जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत जोडून राहा.
1.शेअर मार्केट म्हणजे काय ?
आपला व्यवसाय करण्यासाठी ज्या प्रकारे आपण भांडवल उभा करण्यासाठी कर्ज घेतो त्याचप्रमाणे मोठमोठ्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये त्यांचे शेअर्स जारी करून भांडवल उभारतात.शेअर म्हणजे भाग, तर आपण ज्या कंपनीचे शेअर्स विकत घेतो म्हणजेच भाग विकत घेतो आणि त्या कंपनीचे भाग मालक किंवा भागधारक (share holders)बनतो. सोप्या भाषेत सांगायचं तर बिझनेस पार्टनर बनतो.
जेव्हा कंपनी ग्रो करते तेव्हा कंपनीला फायदा होतो आणि लाभांशद्वारे शेअर भागधारकांना कंपनी नफा वाटप करते. शेअर मार्केट हा एक सार्वजनिक व्यापार आहे ज्यामध्ये विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो.शेअर मार्केट हे संधी देत लहान-मोठे गुंतवणूकदारांना विविध व्यवसायांच्या मालकीमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांच्या यशातून नफा मिळवण्यास.
2.शेअर मार्केट जुगार कि व्यवसाय ?
शेअर मार्केट जुगार एक व्यवसायिक क्रिया आहे ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये अवैध, अनुचित किंवा अनैतिक तंत्रज्ञान, कौशल्य वा करंचा वापर करून लाभ कमवायला प्रयत्न केले जाते. जुगार किंवा मार्केट मेनिपुलेशन या प्रक्रियेच्या द्वारे, शेअर मूल्यांच्या निर्धारणात असंतुलन तयार करणे, शेअर बाजारातील अधिकारी व मुद्रांकांच्या प्रशासनात छल करणे, खरेदी विक्रीसाठी किंवा कंपनींची अधिकृत माहिती वापरून अनुचित फायदा कमवायला प्रयत्न केले जाते.
जुगार केलेल्या व्यक्तींनी काही माध्यमांचा वापर करून शेअर मूल्यांच्या अस्थिरता, प्रकृतीची भ्रमिती व केंद्रीय वित्तीय संस्थांच्या निर्देशांचा छल करून शेअर मार्केटमध्ये लाभ कमवतात. जुगारच्या कारणाने शेअर मूल्यांच्या व्यत्ययांनी व्यापारातील विश्वासाची उडी घालू शकते, आर्थिक प्रणालीत कंट्रोलचा दुःख घालू शकते आणि सार्वजनिक विश्वासाला क्षीण करू शकते.
महत्त्वाचे नोंदणीकृत शेअर मार्केट्स जुगारच्या व्यापाराला कठीणता आणि दणकावणारी कारवाईंची तडका करण्यात येतात. शेअर मार्केटच्या नियंत्रणात असलेल्या संस्थांनी जुगार व्यापाराविरुद्ध नियमांची राखणी करून घेतली आहे आणि त्यांच्या प्रयत्नांचा विरोध करण्याचे कारण काढले जाते. असा व्यापार अनुचित आणि आपत्तिजनक असतो आणि वित्तीय बाजारात विश्वास व्यवस्थापनात खंडिती पुरवू शकतो. यासाठी, स्वतंत्र वित्तीय निरीक्षण निकालाचे अंगीकार केले गेले आहे आणि उच्च नैतिक मानकांचा पालन केला जातो शेअर मार्केटमध्ये.
जुगारचा व्यवसाय अवैध आहे आणि कायदेशीर प्रतिक्रिया आणि सज्जा प्रक्रिया द्वारे कायद्यांची छानखबर आहे. त्यामुळे, याचे अनुभव व ज्ञान असलेल्या वित्तशास्त्रज्ञांची सल्ले घेणे, विश्वासार्ह वित्तीय सल्लेखन कंपन्यांच्या सहाय्याने काम करणे आणि विश्वासार्ह निवेशांच्या मार्गदर्शनाने व्यक्तिगत निवेशांमध्ये सावधानपणे काम करणे आवश्यक आहे.
शिकून न घेता आणि समजून न घेता आपण कुठलाही व्यवसाय केला तर तो एक जुगारच असतो. बरेच से लोक मागचा पुढचा कोणताही विचार न करता कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा काही व्हिडिओ वरून आणि सोशल मीडिया वरूनजाहिरातींना बळी पडतात आणि त्यांचे सर्व कमाई शेअर मार्केटमध्ये गमावतात.
3.शेअर बाजार काम कसे करते?
कोणत्याही व्यवसायाप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा जोखीम आणि बक्षीस किंवा नफा यांचा समावेश असतो. जर आपण शेअर्स मध्ये long टर्म साठी गुंतवणूक केली तर आपल्याला लक्षणीय परतावा मिळू शकतो परंतु तोट्याचाही धोका असतो. आणि याच कारणामुळे गुंतवणूक करताना कुठल्याही कंपनीची आर्थिक स्थिरता, उद्योगाची गतिशीलता आणि बाजार परिस्थिती (फंडामेंटल ऐनालीसीस ) या सर्व घटकांचा विचार करून मूल्यांकन करावे.
व्यवसाय म्हटले की स्पर्धात्मक वातावरण आलेच आणि याचमुळे शेअर मार्केटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये हे वातावरण असतं तर विविध कंपन्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे मूल्यमापन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात . आणि यासाठी विविध कंपन्या गुंतवणूकदारांना डिव्हीडंट आणि बोनस देतात. तर जाणून घेऊया शेअर मार्केट कसे काम करते.
पण शेअर मार्केट समजणे इतके सोपे नाही, तुम्हाला अनेक मूलभूत संज्ञा माहित असणे आवश्यक आहे जसे: SEBI म्हणजेच सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याची शेअर मार्केटमध्ये मोठी भूमिका आहे.
याशिवाय तुमच्यासाठी आयपीओ, डीमॅट खाते, सेन्सेक्स आणि निफ्टी, इक्विटी, कमोडिटी, चलन, डेरिव्हेटिव्ह्ज, डिव्हिडंड, बोनस या सर्व गोष्टी समजून घेणे खूप महत्वाचे आहे. ते समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेवू .
समजा तुम्ही एक कंपनी सुरू केली आणि काही काळ तुमची कंपनी खूप चांगली चालली, पण आता तुम्हाला तुमची कंपनी आणखी पुढे न्यावी लागेल, ज्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयांची गरज आहे, परंतु तुमच्याकडे इतके पैसे नाहीत. तुम्ही लोन घ्यायचे बघाल पण त्याच्यावर व्याज भरावे लागते . दुसरे तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडून उधार घेवू शकता पण कोणी इतके पैसे देत नाही .
सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही तुमची कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्ट करणे .आणि कॉम्पानिचीचे शेअर्स जरी करणे . मग लोक तुमच्या कंपनीत पैसे लावतील.
त्याच्यासाठी तुम्हाला पहिले तुमची कंपनी stock exchange( BSE आणि NSE)वर लिस्ट करावी लागेल .कंपनी लिस्ट करण्यासाठी तुम्हाला पहिले सेबी(SEBI) कडे जावे लागेल.सेबी ला तुच्या कंपनीचे सगळे details द्यावे लागेल आणि एकदा का सेबी ने कंपनी verify करून approval दिले कि माघ तुम्ही कंपनी stock exchange वर लिस्ट करू शकतात.
आता तुम्ही कोम्पनोइसथि जेवढे कॅपिटल लागते त्या हिशोबाने शेअर्स च्या किमत काढाल आणि यालाच शेअर मार्केटच्या भाषेत IPO म्हणजेच Initial public offerering असे म्हणतात.
यानंतर जेव्हा लोक तुमचे शेअर्स खरेदी करतील तेव्हा तुमच्याकडे पैसे जमा होतील.
शेअर मार्केटमध्ये विविध असे महत्त्वाचे घटक असतात ते खालील प्रमाणे
शेअर बाजारातील महत्त्वाचे घटक
- गुंतवणूकदार : शेअर मार्केटमध्ये खरेदी आणि विक्री करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था.
- स्टॉक : विविध कंपन्यातील शेअर्स म्हणजे स्टॉक.
- स्टॉक एक्सचेंज : हे एक प्लॅटफॉर्म आहे शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्यासाठी. For e.g नॅशनल स्टॉक एक्सचेंज, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, NASDAQ ,लंडन स्टॉक एक्सचेंज आणि टोकियो स्टॉक एक्सचेंज.
- दलाल (broker) : खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील व्यवहार सुलभ करण्यासाठी जे मध्यस्थ असतात त्यांना दलाल म्हणतात. for e.g Zerodha, Angel, Sher khan, Dhan etc
मोफत डिमॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570
4.शेअर म्हणजे काय?
शेअर म्हणजे भाग किंवा हिस्सा. जेव्हा तुम्ही कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे शेअर होल्डर किंवा भागधारक बनतात. शेअर्सची किंमतXYZ काही पण असू शकते. ज्या व्यक्तीकडे कंपनीचे सर्वात जास्त शेअर्स असतात त्या व्यक्तीचा कंपनीवर मालकी हक्क सर्वात जास्त असतो.
5.शेअर्स ची किंमत कशी वाढते किंवा कमी होते?
शेअर मार्केटमध्ये कोणत्याही शेअरची किंमत मागणी (demand)आणि पुरवठा(supply) यांच्या आधारे वाढते किंवा कमी होते. कंपनीच्या शेअर्सचे मूल्यमापन मागणी आणि पुरवठा या आधारावर केले जाते.
जर एखाद्या कंपनीच्या स्टॉकला मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर त्याच्या शेअरची किंमत वाढते, त्याचप्रमाणे जेव्हा पुरवठा जास्त आणि मागणी कमी असेल तेव्हा शेअरची किंमत कमी होते.
प्रत्येक कंपनीच्या शेअरची किंमत वेगवेगळी असते. प्रत्येक छोटी-मोठी लिस्टेड कंपनी दररोज व्यवसाय करते,ज्यामध्ये ती कधी नफा तर कधी तोटा करते आणि त्यामुळेच कंपनीच्या शेअर्समध्ये कालांतराने चढ-उतार होत राहतात.
त्यामुळे जेव्हा कंपनीचा व्यवसाय वाढतो आणि कंपनीला नफा मिळतो तेव्हा अनेक गुंतवणूकदार त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायला लागतात आणि शेअरची किंमत वाढते. याउलट,जेव्हा कंपनीला तोटा होतो,तेव्हा लोक त्याचे शेअर्स पटकन विकायला लागतात, त्यामुळे शेअरची किंमत खाली जाते.
6.शेअर मार्केटचे मुख्यतः दोन प्रकार आहेत.
जर एखाद्या कंपनीला आपले शेअर्स इश्यू करायचे असतील गुंतवणूकदारांना ,तर ते डायरेक्ट इशू करू शकत नाही त्यासाठी त्यांना पहिली स्टेप घ्यावी लागते आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग याच्यामध्ये कंपनी आपल्या शेअर्स मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देतात आणि यालाच प्रायमरी मार्केट असे म्हणतात.
प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूकदार जे पैसे गुंतवतात ते थेट कंपनीकडे जमा होतो . प्रायमरी मार्केटमध्ये शेअर्स सगळ्यांनाच खरेदी करता येत नाही हे लकी ड्रॉ प्रमाणे असते. प्रायमरी मार्केटची प्रोसेस पूर्ण झाल्यावर शेअर सेकंडरी मार्केटमध्ये येतात आणि सेकंडरी मार्केटमध्ये कोणीही शेअर्स खरेदी करू शकतात. सेकंडरी मार्केट म्हणजे शेअर्स एक्सचेंज लिस्ट मध्ये येतात. आणि इथे शेअर्सची खरेदी विक्री चालते.
निष्कर्ष | Conclusion
आज आपण शेअर मार्केटची थोडीशी ओळख करून घेतली तर शेअर मार्केट बद्दल अजून सखोल ज्ञान घेण्यासाठी आमचे इतर लेख नक्की वाचा.
प्रश्न उत्तरे | FAQ
१. शेअर मार्केट म्हणजे काय?
उत्तर :- शेअर मार्केट हा एक व्यापार आहे ज्याच्या मध्ये शेअर खरेदी आणि विक्री करतात.
२. शेअर मार्केट मधून आपण पैसे कमवू शकतो का?
उत्तर :- होय.
३. आपण शेअर मार्केटमध्ये करिअर करू शकतो का?
उत्तर :- हो आपण शेअर मार्केटमध्ये स्वतःचे करिअर घडवू शकतो.