प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट/ Primary Market and Secondary Market
शेअर मार्केट हे विविध बाजारपेठा आणि एक्सचेंजेस यांनी बनलेला आहे, जेथे स्टॉक, बॉण्ड्स आणि कमोडिटी, करन्सी यासारख्या आर्थिक साधनांचा व्यापार केला जातो. आधीच्या पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटचे दोन प्रमुख प्रकार पडतात प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. तर आज आपण जाणून घेऊया प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट यामधील फरक, त्यांचा अर्थ, फायदे आणि तोटे, तसेच प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट यामध्ये गुंतुवणूक कशी करावी इत्यादी.
प्रायमरी मार्केट म्हणजे काय?
प्रायमरी मार्केट म्हणजे जिथे भांडवल उभारण्यासाठी प्रथमच कंपन्या किंवा सरकारांद्वारे सिक्युरिटीज जारी केल्या जातात आणि ते विकल्या जातात. याला नवीन इशू मार्केट असेही म्हणतात आणि ही जनतेला सिक्युरिटीज ची प्रारंभिक ऑफर असते.
-प्रायमरी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या, संस्था किंवा सरकार भांडवल उभा करण्यासाठी त्यांचे स्टॉक्स, बॉण्ड इशू करतात आणि ते विकतात या प्रक्रियेला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) असे म्हणतात.
– प्रायमरी मार्केटचे वेगवेगळे उद्दिष्ट आहेत जसे की त्यांच्या कामकाजासाठी वित्त पुरवठा गोळा करणे, नवीन प्रकल्प विकसित करण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी, निधी विस्तारासाठी आणि त्यांचे वेगवेगळे असे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी .
-प्रायमरी मार्केट हे एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करतात जिथे वेगवेगळ्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास सक्षम करतात.
-प्रायमरी मार्केट हे युनायटेड स्टेट्स मधील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन किंवा भारतातील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड यासारख्या संस्थांच्या अंतर्गत काम करतात.
-वेगवेगळ्या गुंतवणूकदारांची मागणी, बाजाराची परिस्थिती आणि सिक्युरिटीज चे मूल्य यावरून प्रायमरी मार्केटमध्ये सिक्युरिटी ची किंमत शोधली जाते.
-पहिले सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या गुंतवणूकदारांना जसे की संस्थात्मक गुंतवणूकदार, उदाहरणार्थ म्युचल फंड आणि पेन्शन फंड तसेच किरकोळ गुंतवणूकदारांना प्रायमरी मार्केट प्रारंभिक ऑफर मध्ये सहभागी होण्यास संधी देते .
– प्रायमरी मार्केट गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या गुंतवणुकीमध्ये आर्थिक वाढ होण्यासाठी योगदान देते.
सेकंडरी मार्केट म्हणजे काय?
सेकंडरी मार्केट म्हणजे जिथे पहिलेच जारी केलेल्या कंपन्या त्यांची स्टॉक गुंतवणूकदार मध्ये खरेदी आणि विक्री केल्या जातात. याला आफ्टर मार्केट असेही म्हणतात.
-सेकंडरी मार्केट हे गुंतवणूकदारांना एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करते जिथे वेगवेगळे स्टॉक, बॉण्ड आणि कमोडिटी यांची खरेदी विक्री सुलभपणे होते. ही खरेदी विक्री म्हणजे व्यापार स्टॉक एक्सचेंज वर होतात.
-सेकंडरी मार्केटमध्ये वेगवेगळे ब्रोकर मध्यस्थ म्हणून काम करतात ते गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यात सेवा प्रदान करतात.
-सेकंडरी मार्केटमध्ये वेगवेगळे संस्थात्मक गुंतवणूकदार, वैयक्तिक किरकोळ गुंतवणूकदार आणि इतर गुंतवणूकदार यांना व्यापार करण्यात सहभागी होऊ देते. तसेच गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी, त्याच्यामध्ये विविधता आणण्यासाठी आणि योग्य तो परतावा मिळवण्यासाठी संधी प्रदान करते.
-सेकंडरी मार्केट देखील प्रायमरी मार्केट सारखे युनायटेड स्टेट्स मधील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन किंवा भारतातील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यासारख्या संस्थांच्या अंतर्गत काम करतात आणि बाजाराची अखंडता राखण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हितांचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे नियम लागू करतात.
-सेकंडरी मार्केट हे खूप सार्या घटकांची निगडित आहे जसे की शेअर मार्केट मधील परिस्थिती, कंपनीची कामगिरी, आर्थिक बातम्या आणि गुंतवणूकदारांच्या भावना यामुळे शेअर मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात आणि खरेदी विक्री सतत चालू असल्यामुळे त्यांच्या किमती बदलत असतात.
-सेकंडरी मार्केट गुंतवणूकदारांना त्यांचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यास त्यांच्या भांडवलामध्ये वाढ होण्यास आणि गुंतवणुकी द्वारे योग्य तो परतावा मिळण्यास मदत करते.
प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमधील फरक
प्रायमरी मार्केट |
सेकंडरी मार्केट |
| प्रायमरी मार्केट म्हणजे जिथे कंपन्या किंवा सरकार हे त्यांचे सिक्युरिटी म्हणजेच शेअर पहिल्यांदा सार्वजनिक जारी करतात. | सेकंडरी मार्केट म्हणजे जिथे पूर्वी जारी केलेल्या सिक्युरिटीज किंवा शेअर गुंतवणूकदारांमध्ये खरेदी आणि विक्री करतात. |
| उदाहरणार्थ ; IPO आणि बॉण्ड इशुंस. | उदाहरणार्थ; स्टॉक, बॉंड आणि इतर आर्थिक साधने. |
| प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज विकून भांडवल उभे करण्यासाठी कंपनी किंवा संस्था यांचा समावेश असतो. म्हणजेच व्यवहार हा डायरेक्ट कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये असतो. | सेकंडरी मार्केटमध्ये , IPO जारी करणाऱ्या कंपनीच्या सहभागाशिवाय सिक्युरिटी चा वापर करतात.म्हणजेच व्यवहार हा एक गुंतवणूकदार आणि दुसरा गुंतवणूकदार यांच्यामध्ये असतो. |
| प्रायमरी मार्केट जारी करणाऱ्या कंपनीसाठी भांडवल निर्माण करतात. | सेकंडरी मार्केट जारी करणाऱ्या कंपनीसाठी भांडवल निर्माण करत नाही. |
| प्रायमरी मार्केटमध्ये IPO द्वारे मिळणारे पैसे कंपनी त्यांच्या उद्दिष्टांसाठी वापरतात जसे की व्यवसाय ऑपरेशन, कंपनीचा विस्तार आणि इतर आर्थिक उद्दिष्टे. | सेकंडरी मार्केट गुंतवणूकदारांना तरलता प्रदान करते, त्यांना आपापसात शेअर खरेदी आणि विक्री करण्यास परवानगी देते. |
| प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूकदार विशिष्ट सबस्क्रिप्शन कालावधी दरम्यानच ऑफरची सदस्यत्व घेऊन आयपीओ मध्ये भाग घेतात. | सेकंडरी मार्केटमध्ये, शेअर मार्केटच्या वेळेत गुंतवणूकदार कधीही सिक्युरिटीची खरेदी आणि विक्री करू शकतात. |
| सिक्युरिटीज चे कायदे आणि नियमान द्वारे नियमित प्रायमरी मार्केट असते. | स्टॉक एक्सचेंज आणि इतर नियमक संस्थेद्वारे सेकंडरी मार्केट नियमित असते. |
प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी?
- नवीन येणाऱ्या IPO चे संशोधन : प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नवीन येणाऱ्या IPO चे संशोधन करा. कंपनी बद्दल संपूर्ण माहिती चा अभ्यास करा, जसे की कंपनीचे बिझनेस मॉडेल, आर्थिक वाढीच्या शक्यता आणि उद्योग स्थिती.
- डी -मॅट अकाउंट उघडा : IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डि-मॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. डि-मॅट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.
- IPO साठी अर्ज करा: तुम्हाला ज्या IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे तो निवडा आणि तुमच्या ब्रोकर किंवा बँकेने दिलेला अर्ज भरा.
- रक्कम भरा : IPOच्या वेळेच्या मर्यादित पेमेंट केल्याची खात्री करा. तुम्ही पेमेंट नेट बँकिंग किंवा UPI वापरून करू शकतात.
- वाटप स्थिती चेक करा: ओवर सबस्क्रीप्शन आणि IPOची मागणी यावर IPOचे वाटप केले जाते. स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर किंवा रजिस्टारच्या वेबसाईटवर वाटप स्थिती तुम्ही चेक करू शकतात. जर तुम्हाला शेअर वाटप झाले असतील तर ते तुमच्या डि-मॅट खातात लिस्टिंगच्या तारखेला जमा होतात. आणि जर तुम्हाला IPO मिळाला नसेल तर तुमची रक्कम तुमच्या बँक खातात परत केली जाते.
- शेअर्सची खरेदी आणि विक्री: एकदा का कंपनी सूचीबद्ध झाली की तुम्ही स्टॉक एक्सचेंज वर शेअरची खरेदी आणि विक्री करू शकतात. तुम्ही घेतलेले शेअर्स होल्ड करू शकता किंवा ते विकण्याचा विचार करू शकतात.
सेकंडरी मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी?
- ट्रेडिंग अकाउंट आणि डि-मॅट अकाउंट उघडा: सेकंडरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात पहिले तुमची ट्रेडिंग अकाउंट आणि डि-मॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. सर्वात पहिले तुम्ही नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर निवडा आणि ट्रेडिंग आणि डि-मॅट अकाउंट ओपन करा.
- फंड ट्रान्सफर करा: शेअर्सची किंवा सिक्युरिटीज ची खरेदी करण्यासाठी तुमच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये फंड ट्रान्सफर करा.
- संशोधन आणि विश्लेषण करा: तुम्हाला ज्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करायचे आहे त्याबद्दल संशोधन आणि विश्लेषण करा जसे की कंपनीचे आर्थिक स्थिती, बाजारातील कल, उद्योगाचा दृष्टिकोन इत्यादी.
- गुंतवणुकीची रक्कम ठरवा : तुम्हाला सिक्युरिटीज मध्ये किती पैसे गुंतवायचे आहे ते ठरवा. त्यासाठी तुमची जोखीम सहनशीलता, तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि वेळ मर्यादा या गोष्टींचा विचार करा.
- शेअर्स किंवा सिक्युरिटीज खरेदी करा: तुम्ही तुमच्या ट्रेडिंग खात्यात लॉगिन करा आणि तुम्हाला पाहिजे त्या सेक्युरिटी किंवा शेअर्स खरेदी करा.
- स्टॉप लॉस ऑर्डर लावा: एकदा का तुम्ही शेअर्स खरेदी केले तर आपला तोटा होऊ नये यासाठी स्टॉप लॉस ऑर्डर लावा.
- शेअर होल्ड करा किंवा विक्री करा: तुम्ही घेतलेल्या शेअर्समध्ये जर तुम्हाला पाहिजे तो नफा मिळाला तर तो तुम्ही विकू शकतात किंवा तुम्हाला लॉंग टर्म साठी गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही ते शेअर्स होल्ड करू शकतात. यासाठी तुमचे गुंतवणूक क्षितिज सेट करा.
- पोर्टफोलिओ पुनरावलोकन: तुमच्या पोर्टफोलिओचा तुम्ही नियमित पुनरावलोकन करा. तसेच तो संतुलित करण्याचा विचार करा.
- शेअर मार्केटच्या माहितीत रहा: तुमची गुंतवणूक सेफ ठेवण्यासाठी तुम्हाला नेहमी शेअर मार्केट मधील ट्रेंड कंपनीच्या बातम्या आणि आर्थिक घडामोडीने वर अपडेट राहावे लागेल.
- जोखीम व्यवस्थापनाची अंमलबजावणी करा.
- व्यावसायिक सल्ला घ्या.
प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे:
- लक्षणीय भांडवल वाढीची शक्यता: प्रायमरी मार्केट म्हणजे IPO आणि IPO मध्ये गुंतवणूकदारांना कंपनीच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी होता येते. जर कंपनीने चांगली कामगिरी केली आणि शेअरच्या किंमतीत वाढ झाली तर गुंतवणूकदारांना लक्षणीय भांडवल वाढीचा फायदा होतो.
- नवीन संधीमध्ये प्रवेश: प्रायमरी मार्केट कंपनीला सेकंडरी मार्केटमध्ये उपलब्ध नसलेल्या नवीन गुंतवनुकीमध्ये संधीमध्ये प्रवेश प्रदान करते. याचा भविष्यात यशाचा संभाव्य फायदा होतो.
- कमी किमतीत शेअर्स मिळवण्याची संधी: IPO किंवा नवीन सिक्युरिटीज ऑफर ची किंमत शेअर मार्केट मूल्यापेक्षा कमी असू शकते, यामुळे गुंतवणूकदारांना कमी किमतीत शेअर मिळवण्याची संधी मिळते. आणि दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो.
- दीर्घकालीन परताव्यासाठी संधी: प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांना कंपनीच्या वाढीवर दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवता येतो म्हणजेच लॉन्ग टर्म साठी शेअर्स घेऊन ते कालांतराने भरीव नफा मिळवू शकतात.
प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे
- अधिक जोखीम आणि अनिश्चितता: नवीन कंपन्यांकडे मर्यादित ऑपरेटिंग इतिहास, व्यवसाय मॉडेल आणि अनिश्चितता असू शकते. ज्यामुळे प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूक अधिक जोखमीची असू शकते.
- ट्रॅक रेकॉर्ड चा अभाव: प्रायमरी मार्केटमध्ये नवीन कंपन्या स्थापन झाल्यामुळे त्यामध्ये ट्रॅक रेकॉर्डचा अभाव असू शकतो आणि याच कारणामुळे गुंतवणूकदारांना कंपनीची अस्थिरता आणि संभाव्य जोखीम यांचे मूल्यांकन करणे कठीण जाऊ शकते.
- अस्थिरता: नव्याने सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत अस्थिरता असू शकते.
- ओवर व्हॅल्युएशनची संभाव्यता: प्रायमरी मार्केटमध्ये जारी केलेल्या सिक्युरिटी ची किंमत शेअर मार्केटमधील किंवा गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे त्यांच्या मूल्यापेक्षा जास्त असू शकते. यामुळे गुंतवणुकीचा धोका वाढू शकतो आणि शेअर मार्केट मधील भावना बदलल्यास कमी परतावा किंवा तोटा होऊ शकतो.
- मर्यादित तरलता: प्रायमरी मार्केटमध्ये खरेदी केलेल्या सिक्युरिटीजची सुरुवातीला तरलता ही मर्यादित असते, त्यामुळे शेअर ताबडतोब विकणे हव्या त्या किमतीत हे आव्हानात्मक असू शकते.
सेकंडरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
- पारदर्शकता: सेकंडरी मार्केट मध्ये सिक्युरिटीज चे बाजार भाव सहज उपलब्ध असतात, यामुळे हे मार्केट किमतीची पारदर्शकता प्रदान करते.
- तरलता: सेकंडरी मार्केट मध्ये उच्च तरलता असते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना सिक्युरिटीची सहजपणे खरेदी आणि विक्री करता येते.
- मार्केटची कार्यक्षमता: सेकंडरी मार्केट हे उच्च व्यापाराचे प्रमाण, बाजारातील स्पर्धा, असंख्य खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या उपस्थितीमुळे अधिक कार्यक्षम असते. आणि त्याचमुळे जास्त किंमत शोधणे सहज सोपे होते आणि उपलब्ध माहिती प्रतिबिंबित होते.
- गुंतवणुकीचे पर्याय: सेकंडरी मार्केट गुंतवणूकदारांना विविध गुंतवणुकीचे पर्याय प्रदान करते जसे की स्टॉक, बॉण्ड, एक्सचेंज ट्रेडेड फंड,म्युचल फंड आणि इतर आर्थिक साधने .असे विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असते त्यामुळे गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण पोर्टफोलियो तयार करता येतो.
- प्रायमरी मार्केटच्या तुलनेत कमी जोखीम: सेकंडरी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कमी जोखीम असते. कारण यामध्ये चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या प्रस्थापित कंपन्या त्यांची अधिक स्थिरता, बाजार ओळख असा डेटा उपलब्ध असतो आणि यामुळे जोखीम कमी असते.
- ऐतिहासिक कामगिरी डेटा: सेकंडरी मार्केट जुन्या सूचीबद्ध स्थापित कंपन्यांची ऐतिहासिक कामगिरी डेटा प्रदान करतात. यामध्ये कंपनीची स्थिरता, वाढीची क्षमता, आर्थिक स्टेटमेंट, ट्रॅक रेकॉर्ड या गोष्टींचा समावेश असतो.
सेकंडरी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे
- मार्केट मॅन्युपुलेशन: सेकंडरी मार्केटमध्ये सर्वाधिक मॅन्युपुलेशन होते. ज्यामध्ये अनैतिक पद्धती स्टोक च्या किमतीवर प्रभाव टाकू शकतात आणि कृत्रिम ट्रेडिंग वोल्युम तयार करू शकतात आणि यांचा गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- मार्केटमधील अस्थिरता: सेकंडरी मार्केट मध्ये उच्च अस्थिरता आणि किमतीमधील चढ-उतार यांची शक्यता असते. ही अस्थिरता बाजारातील गतिशील्त, आर्थिक घटक आणि गुंतवणूकदारांच्या भावना स्टॉकच्या किमतीवर परिणाम करू शकतात यामुळे गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम होऊ शकतो.
- कमी वाढीचे संभाव्यता: प्रस्थापित सिक्युरिटीची वारीची क्षमता ही प्रायमरी मार्केटमधील गुंतवणुकीच्या तुलनेत कमी असते.
- इनसायडर ट्रेडिंग रिस्क: सेकंडरी मार्केटमध्ये इन साईड ट्रेडिंगचा धोका असतो.
- वेळेची आव्हाने: गुंतवणूकदारांना अल्पमुदतीच्या किमतींच्या हालचालींचा अंदाज लावणे कठीण होऊ शकते आणि त्यांना सर्वात योग्य वेळी सिक्युरिटीची खरेदी आणि विक्री करणे अवघड जाऊ शकते. कारण शेअर मार्केटची अचूक वेळ ठरवणे हे आव्हानात्मक असते.
- मर्यादित नियंत्रण: सेकंडरी मार्केटमधील गुंतवणूकदार निष्क्रिय भागधारक असतात म्हणजेच गुंतवणूकदारांचे त्याच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्या व्यवस्थापनावर आणि निर्णय घेण्यावर मर्यादित नियंत्रण असते.
निष्कर्ष | Conclusion
प्रायमरी मार्केट म्हणजे जिथे कंपन्या गुंतवणूकदारांकडून भांडवल उभे करण्यासाठी नवीन सिक्युरिटी जारी करतात.
तसेच सेकंडरी मार्केट म्हणजे जिथे पहिलेच जारी केलेले सिक्युरिटीज गुंतवणूकदारांमध्ये खरेदी आणि विक्री करतात.
प्रायमरी आणि सेकंडरी हे दोन्ही मार्केट वित्तीय व्यवस्थेच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. आणि ते गुंतवणूकदारांना त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म प्रदान करतात.
प्रश्न उत्तरे | FAQ
- प्रायमरी मार्केट म्हणजे काय?
उत्तर: प्रायमरी मार्केट म्हणजे जिथे कंपन्या गुंतवणूकदारांकडून भांडवल उभे करण्यासाठी सिक्युरिटी जारी करतात. - प्रायमरी मार्केटमध्ये सिक्युरिटी कसे दिले जातात?
उत्तर: प्रायमरी मार्केटमध्ये सिक्युरिटी IPO द्वारे दिले जातात. - सेकंडरी मार्केट म्हणजे काय?
उत्तर: सेकंडरी मार्केट म्हणजे जिथे अगोदर जारी केलेल्या कंपन्यांचे शेअर्सचे खरेदी आणि विक्री करतात. - गुंतवणूकदार आयपीओ मध्ये न जाता सेकंडरी मार्केटमध्ये भाग घेऊ शकतात का?
उत्तर: होय. गुंतवणूकदारांनी सुरुवातीच्या आयपीओ मध्ये भाग घेतला नसला तरीही ते सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करू शकतात. - सेकंडरी मार्केटमध्ये स्टॉक ब्रोकर्स कोणते भूमिका बजावतात?
उत्तर: स्टॉक ब्रोकर हे सेकंडरी मार्केटमध्ये खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करतात आणि गुंतवणूकदारांच्या वतीने व्यवहार करतात.
