उद्याचे मार्केट – 19-07-2023 Nifty / Bank Nifty
Nifty Analysis

17 तारखेला निफ्टी 19719 ला क्लोज झाले .तेव्हा मार्केट अप ट्रेंड मध्ये होते. नंतर 18 जुलैला मार्केट जवळजवळ 80 पॉईंट ने गॅप अप झाले. दिवसभर मार्केट Volatile होते. निफ्टी चा चार्ट Day कॅण्डल मध्ये बघितला तर तो कालच्या दिवसात ओपन झालेल्या Position ला क्लोज झाला.
15 मिनिटाच्या टाईम फ्रेम वर एक इन्स्टिट्यूशनल रेड कॅण्डल तयार झालेली आहे. इन्स्टिट्यूशनल म्हणजे बिग ट्रेडर्स , म्हणजेच FII आणि DII यांच्यासारखे.
याचाच अर्थ इथून करेक्शन होऊ शकते आणि मार्केट डाऊन साईडला आणखीन जाऊ शकते.
उद्या जर मार्केट गॅप झाले तर 19852 पर्यंत मार्केट जाऊ शकते. मग या वेळेस आपण CALL बाय करू शकतो आणि जर मार्केट गॅप डाऊन झाले तर इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला मार्केट वरती जाऊन परत 19600 पर्यंत खाली येऊ शकते आणि मग आपण PUT बाय करू शकतो. जर मार्केट फ्लॅट ओपन झाले तर ट्रेड घेणे टाळावे.
Bank Nifty Analysis
दिनांक 18 जुलैला बँक निफ्टी गॅप अप ओपन झाले. त्यामुळे आपल्याला एन्ट्री करण्यासाठी संधी मिळाली नाही. बँक निफ्टी सुरुवातीला जरी गॅप अप झाले तरी तो गॅप मार्केटने परत भरून काढला आणि मार्केट ओपन झालेल्या पोझिशनला परत आले.
15 मिनिटात मार्केट तीनशे पॉईंट ने अप झाले होते परंतु साडे अकरानंतर इन्स्टिट्यूशनल रेड कॅण्डल तयार झाली आणि पूर्ण गॅप भरून काढला. आणि नंतर मार्केट क्लोजिंग पर्यंत Sideways राहिले होते. पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेम वर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार होताना दिसत आहे, पण हा एक ट्रॅप असू शकतो. कारण इन्स्टिट्यूशनल कॅण्डल जवळपास 450 पॉईंट्स ची तयार झालेली आहे त्यामुळे मार्केट 45600 पर्यंत जाऊन परत खाली येण्याची शक्यता जास्त आहे.
म्हणून मार्केट ओपन झाल्या झाल्या CALL बाय करण्याची घाई करू नका आणि गॅप डाऊन झाल्या वर लगेच PUT बाय करण्याची घाई सुद्धा करू नये. इमेज मध्ये लेव्हल्स काढल्या आहेत जर आपल्या लेव्हल्स आल्या तरच ट्रेड घ्या, अन्यथा ट्रेड घेण्यास टाळा.



